नवरा असावा तर असा ! गृहप्रवेश करताना मौनी रॉय झाली भावूक, मग पती सूरज नांबियारने केलं असं काही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 14:07 IST2022-02-01T14:02:50+5:302022-02-01T14:07:01+5:30

नागिन फेम मौनी रॉय (Mouni Roy) आता मिसेस सूरज नांबियार झाली आहे. मौनी रॉयच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर ट्रेंड झाले होते.

Mouni roy gets emotional on her griha pravesh ceremony | नवरा असावा तर असा ! गृहप्रवेश करताना मौनी रॉय झाली भावूक, मग पती सूरज नांबियारने केलं असं काही

नवरा असावा तर असा ! गृहप्रवेश करताना मौनी रॉय झाली भावूक, मग पती सूरज नांबियारने केलं असं काही

नागिन फेम मौनी रॉय (Mouni Roy) आता मिसेस सूरज नांबियार  झाली आहे. मौनी रॉयच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर ट्रेंड झाले होते. गोव्यातील लग्नसोहळा झाल्यानंतर नवविवाहित मौनी रॉय मुंबईतील तिच्या नवीन घरी पोहोचली. गृहप्रवेश करताना मौनी रॉय भावूक झाली.

 गृहप्रवेशाच्या वेळी भावूक झालेल्या मौनीचं मुंबईतील नवीन घरात कुटुंबीय आणि मित्रमंडळींनी तिचं ग्रँड वेलकम केलं. मौनी रॉयने लाल आणि सोनेरी  साडीमध्ये सुंदर दिसत होती. गृहप्रवेश करताना मौनी रॉय रडू लागली. पत्नीला भावूक पाहून सूरज नांबियारने तिला पॅंपर केलं. सूरज मौनीचे kiss घेतले.  यानंतर गृहप्रवेशाचा विधी सुरू झाल्या.

मौनी रॉयच्या गृहप्रवेशचा व्हिडिओ समोर आले आहे. ज्यामध्ये ती घरात प्रवेश करताना तिच्या पायावरून तांदळाचा कलश पाडताना दिसतेय. गृहप्रवेशानंतर यानंतर या कपलने रात्री  मित्रांसोबत पार्टी केली. मौनीच्या घरी तिचा को-स्टार अर्जुन बिजलानीही उपस्थित होता. मौनी आणि अर्जुन खूप दिवसांपासून मित्र आहेत, अर्जुन मौनीच्या लग्नातही होतो.

 

मौनीचे गोव्यात लग्न झाले होते
मौनी रॉय आणि सूरज नांबियारने २७ जानेवारीला गोव्यात लग्न झालं. सकाळी दोघांनी मल्याळी रितीरिवाजांनुसार लग्न केले. यानंतर रात्री या कपलने बंगाली रितीरिवाजानुसार सुद्धा लग्न केलं.. बॉलिवूड आणि टीव्ही सेलिब्रिटींनी मौनीच्या लग्नाबद्दल अभिनंदन केले. 

मौनीचा ‘सब कुछ’ सूरज हा दुबईत राहतो. बिझनेसमॅन आणि बँक इव्हेस्टर अशी त्याची ओळख आहे. सूरज हा मूळचा बेंगळुरूचा. जैन कुटुंबात जन्मलेल्या सूरजने आर.व्ही.अभियांत्रिकी महाविद्यालयातून सिव्हिल इंजिनीअरिंगमधील बी.टेक केले आहे. तसेच, स्टॅनफोर्ड विद्यापीठात गुंतवणूक, विज्ञान आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्थापनाचा पदविका अभ्यास केला आहे.
 

Web Title: Mouni roy gets emotional on her griha pravesh ceremony