​ ये है मोहोब्बते ही मालिका घेणार लीप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 12:14 IST2017-10-24T06:44:12+5:302017-10-24T12:14:12+5:30

ये है मोहोब्बते ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील रमण आणि इशिताची जोडी तर ...

This is Mohabbateet's leap to take the series | ​ ये है मोहोब्बते ही मालिका घेणार लीप

​ ये है मोहोब्बते ही मालिका घेणार लीप

है मोहोब्बते ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील रमण आणि इशिताची जोडी तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. तसेच या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा या प्रेक्षकांच्या लाडक्या बनल्या आहेत. या मालिकेने आजवर अनेक पुरस्कार मिळवले आहेत. आता ही मालिका काही वर्षांचा लीप घेणार असून लीपनंतर या मालिकेच्या कथानकात अनेक बदल झालेले आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 
मालिकेने लीप घेतल्यानंतर ये है मोहोब्बते या मालिकेचे चित्रीकरण भारतात नव्हे तर परदेशात केले जाणार आहे. या मालिकेचे चित्रीकरण आता बूडापेस्टमध्ये होणार असून या मालिकेतील काही कलाकार चित्रीकरणासाठी बूडापेस्टला रवाना देखील झाले आहेत. 
स्टार प्लसवरील सर्वांची आवडती मालिका ये है मोहोब्बतें आता आंतरराष्ट्रीय बनणार असून ही मालिका आता दीड वर्षांचा लीप घेणार आहे. लीप नंतरच्या सुरुवातीच्या काही भागांचे चित्रीकरण बुडापेस्टमध्ये होणार असून आता या मालिकेत काही नवीन व्यक्तिरेखा सुद्धा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
ये है मोहोब्बते ही मालिका वर्षभरापूर्वीच लीप घेणार होती. पण काही कारणास्तव लीप घेण्याचे पुढे ढकलण्यात आले होते. आता या मालिकेत लीप घेण्यात यावा हा निर्णय प्रॉडक्शन हाऊस आणि वाहिनीने एकत्रित रित्या घेतला आहे. क्रिएटिव्ह टीम नवीन कथानकावर लक्ष केंद्रित करत असताना लॉजिस्टिक्स टीम सध्या बुडापेस्टमध्ये चित्रीकरणाची स्थळे आणि कलाकारांच्या राहण्याच्या सोयीचे गणित मांडत आहे.
ये है मोहोब्बते या मालिकेत दिव्यांका त्रिपाठी, करण पटेल, रुहानिका धवन, आदिती भाटिया यांच्या मुख्य भूमिका आहेत. याच मालिकेच्या चित्रीकरणाच्या दरम्यान दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया यांची ओळख झाली होती आणि या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले होते. ते दोघे दोन वर्षांपूर्वी लग्नबंधनात अडकले. 
ये है मोहोब्बते ही मालिका २०१३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. आज इतकी वर्षं होऊनही या मालिकेची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाही. ही मालिका बालाजी टेलिफ्लिम्सची असून टिआरपीच्या रेसमध्ये नेहमीच अव्वल राहिलेली आहे. 

Also Read : दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया युरोपमध्ये सेलिब्रेट करताहेत लग्नाचा पहिला वाढदिवस

Web Title: This is Mohabbateet's leap to take the series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.