'ये है मोहब्बते' फेम अदिती म्हणतेय खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2017 12:22 IST2017-03-16T06:52:11+5:302017-03-16T12:22:11+5:30

प्रेम हे कधीही कुठेही आणि कुणावरही होवू शकते. म्हणूनच प्रेम हे फक्त प्रेम असते त्याला कसलीच व्याख्या नसते. ये ...

'This is Mohabbateet' Fame Aditi says, Khullam will be open, we both will love | 'ये है मोहब्बते' फेम अदिती म्हणतेय खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो

'ये है मोहब्बते' फेम अदिती म्हणतेय खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो

रेम हे कधीही कुठेही आणि कुणावरही होवू शकते. म्हणूनच प्रेम हे फक्त प्रेम असते त्याला कसलीच व्याख्या नसते. ये मोहब्बते मालिकेतील रूही म्हणजेच अदिती भाटीया प्रेमात पडलीय.विशेष म्हणजे तिने तिचे हे रिलेशनशीप कोणापासूनही लपवून ठेवलेले नाहीय. ये है मोहब्बते मालिकतलाच रूहीच्या भावाची भूमिका करणारा अभिषेक वर्माच्या प्रेमात अदिती पडली आहे.होय, सेटवर बराच वेळ हे दोघे एकत्र घालवत असतात.एवढेच नाही तर तर आदिती सोशल मीडियावर नेहमी एकमेकांचे फोटो शेअर करत असते.तिच्या सोशल मीडियावरील फोटोलाही तिचे चाहते तिला तिच्या या रिलेशनशिपबद्दल विचारताना दिसतात.अदितीही विचारलेल्या प्रश्नांना बिनधास्त उत्तरेही देताना दिसते.अभिषेकसह ती शूटिंग संपल्यानंतर बाहेरही फिरताना दिसते.अभिषेक हा अदितीच्या फॅमिलीशी खूप चांगले ट्युनिंग असल्यामुळे घरातही या दोघांच्या नात्यामुळे आनंदीत असल्याचे कलतंय अदिती भाटीया बालकलाकार म्हणून काही बॉलिवूड सिनेमांमध्येही झळकली आहे.अदितीने 'विवाह','द ट्रेन','शूट आऊट अॅट लोखंडवाला' आणि 'चान्स पे डान्स' या सिनेमांमध्ये ती झळकली होती.आता अदिती 'ये है मोहब्बते' मालिकेत ती रूहीची भूमिका साकारतेय.




काही महिन्यांआधी ये रिश्ता क्या कहलाात है मालिकेतील भाऊ-बहिणीच्या भूमिकेत झळकणारे रोहन मेहरा आणि कांची सिंह यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या.यावर खुद्द रोहन मेहरानेच कांचीसह तो रिलेशनशीपमध्ये असल्याचे सांगितले होते. बिग बॉसच्या 10व्या सिझनमध्ये एंट्री करताच  रोहन मेहराने कांचीसह प्रेम असल्याचा गुपित जगासमोर उघड केले होते. त्यामुळे ऑनस्क्रीन भाऊ-बहिनीचेे प्रेमाप्रमाणेच ख-या आयुष्यातले त्यांचे नाते काही लपून राहिलेले नाहीय.

Web Title: 'This is Mohabbateet' Fame Aditi says, Khullam will be open, we both will love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.