VIDEO : मोदीजी तुम्ही माझं आयुष्य उद्धवस्त केलं..., बूस्टर डोस घेतल्यावर Rakhi Sawantचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 11:19 IST2022-07-19T11:16:01+5:302022-07-19T11:19:17+5:30

 Rakhi Sawant : आपल्या वक्तव्यांमुळे सतत चर्चेत राहणारी राखी सावंत कधी, कुठे काय बोलेल याचा नेम नाही. आता तर तिने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आयुष्य उद्धवस्त केल्याचा आरोप केला. विश्वास बसत नाहीये ना? पण हे खरं आहे.

Modiji Ne Zindagi Barbad Kardi Rakhi Sawant bashes PM Narendra Modi over Booster Dose | VIDEO : मोदीजी तुम्ही माझं आयुष्य उद्धवस्त केलं..., बूस्टर डोस घेतल्यावर Rakhi Sawantचा आरोप

VIDEO : मोदीजी तुम्ही माझं आयुष्य उद्धवस्त केलं..., बूस्टर डोस घेतल्यावर Rakhi Sawantचा आरोप

राखी सावंतला ( Rakhi Sawant) कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन म्हणतात ते उगाच नाही. आपल्या वक्तव्यांमुळे सतत चर्चेत राहणारी राखी सावंत कधी, कुठे काय बोलेल याचा नेम नाही. आता तर तिने कमालच केली. होय, तिने काय करावे? तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आयुष्य उद्धवस्त केल्याचा आरोप केला. विश्वास बसत नाहीये ना? पण हे खरं आहे.
काही दिवसांपूर्वी राखीने कोरोनाचा बूस्टर डोस घेतला. मात्र हा डोस घेतल्यानंतर आपलं आयुष्य उद्धवस्त झाल्याचा आरोप राखीने केला आहे. मला रात्रीची झोप येत नाही, असा दावा करत राखीने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. आता ही काय भानगड आहे, ते जाणून घेऊ. (Rakhi Sawant bashes PM Narendra Modi over Booster Dose)

तर राखी सावंत सोमवारी मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. यावेळी पापाराझींनी तिला घेरलं. मग काय, राखी सूसाट सुटली. विमानतळावर पापाराझींनी तिला अनेक प्रश्न विचारले आणि राखीने प्रत्येक प्रश्नावर भन्नाट उत्तर दिलं. यावेळी तिने पंतप्रधान मोदींवर थेट आरोप करण्यास सुरुवात केली. 
‘मोदीजी तुम्ही माझं आयुष्य उद्धवस्त केलं आहे. मी गेल्या दोन रात्रींपासून झोपलेली नाही. बूस्टर डोस घेतल्यापासून मला झोपचं येत नाही. माझ्या हृदयाची धडधड वाढली आहे. माझे शरीर वेगवेगळ्या गोष्टी मागत आहे. मी फार अस्वस्थ झाली आहे.  बूस्टर डोस घेतल्यापासून माझ्या शरीरात काय सुरु आहे हेच मला कळेनासं झालं आहे. माझा चेहरा सुजलेला आहे. मला अजिबात झोप येत नाही. कशीबशी अर्धा तास मी झोपते. माझी अवस्था खूप वाईट आहे. हे सगळं बघता, हे बूस्टर इंजेक्शन 60, 70, 80, 90 वयाच्या व्यक्तींना द्यायला हवं. ज्यांना चालता-फिरता येत नाही, असं राखी म्हणाली.

ती इथेच थांबली नाही. पुढे ती म्हणाली, ‘मी बूस्टर डोस घेतल्यापासून वेड्यासारखी झाली आहे. मी फक्त आदिलला शोधत आहे. आताही मी त्यालाच भेटायला जात आहे. यावरुन तुम्ही बुस्टर डोसने माझी अवस्था काय झाली असेल, याचा अंदाज बांधू शकता.  मोदीजी, हे कसलं इंजेक्शन  आहे? यात कोणकोणते प्राणी आहेत हेच मला समजत नाही. मला झोप येत नाही. माझे डोळे सुजले आहेत. माझा चेहराही सूजला आहे. हे व्हायग्रा, शिलाजीत आणि वासनेचं इंजेक्शन आहे. त्यासोबतच तिने हे इंजेक्शन न घेण्याचा सल्लाही दिला.
 राखी सावंतने दोन दिवसांपूर्वीच करोनापासून बचाव करण्यासाठी बूस्टर डोस घेतला होता. याचा एक व्हिडीओही तिने सोशल मीडियावर शेअर केला होता. 

Web Title: Modiji Ne Zindagi Barbad Kardi Rakhi Sawant bashes PM Narendra Modi over Booster Dose