‘गुलाम’च्या सेटवर मोबाईल फोनला बंदी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2017 15:35 IST2017-04-19T10:05:18+5:302017-04-19T15:35:18+5:30

या मालिकेला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला असून ही मालिका अल्पवाधीतच ही मालिका रसिकांच्या पसंतीस उतरली आहे. एका मेक-अप कलाकारावरून ...

Mobile phone ban on 'slave' set! | ‘गुलाम’च्या सेटवर मोबाईल फोनला बंदी!

‘गुलाम’च्या सेटवर मोबाईल फोनला बंदी!

मालिकेला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला असून ही मालिका अल्पवाधीतच ही मालिका रसिकांच्या पसंतीस उतरली आहे. एका मेक-अप कलाकारावरून या मालिकेतील विकास मानकताला आणि नीती टेलर या प्रमुख कलाकारांमध्ये अलीकडेच सेटवर मोठे भांडण झाले होते.आता या मालिकेच्या सेटवर लागू करण्यात आलेल्या नव्या नियमामुळे ही मालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

या मालिकेच्या सेटवर मोबाईल फोनचा वापर करण्यास निर्मात्यांनी बंदी केली असून हा नियम कलाकारच नव्हे, तर कर्मचार्‍्यांनाही लागू होतो. दोन प्रसंगांमध्ये अनेकजण आपल्या मोबाईल फोनद्वारे सोशल मीडियावर बिझी असल्यामुळे अनेकदा मालिकेच्या चित्रीकरणास विलंब होऊ लागल्याचे निर्मात्यांच्या लक्षात आले होते. या प्रकारामुळे सेटवर नव्या समस्या उदभवू लागल्याने सेटवर मोबाईल फोनच्या वापरावर निर्मात्यांना बंदी घालावी लागली.सेटवरील मोबाईल बंदीबाबत आम्ही विकास मानकतालाशी संपर्क साधला असता त्याने आम्हाला सांगितले, “मालिकेच्या सेटवर मोबाईल फोन वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. आम्हाला ते चित्रीकरणाच्या स्थळी घेऊन जाता येत नाहीत. पण आम्ही आमच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये किंवा मेक-अप रूममध्ये ते वापरू शकतो.” यासंदर्भात त्याच्याकडे अधिक विचारणा केली असता, तो म्हणाला, “हा निर्णय निर्मात्यांनी घेतला असून त्यामागचं कारण मला माहित नाही. पण   हा एक चांगला निर्णय असून त्यामुळे अभिनेत्यांना आपल्या अभिनयावरच लक्ष केंद्रित करणे सोपे जाते.” मालिकेत रंगीलाची भूमिका साकारणारा परमसिंह म्हणाला, “मी सेटवर माझा मोबाईल फोन कधीच घेऊन जात नव्हतो.ही बंदी लागू होण्याआधीपासूनच मी सेटवर मोबाईल नेत नसे. त्यामुळे मला त्यात काहीच नवं वाटत नाही किंवा त्याबद्दल माझी कसलीही तक्रारही नाही. पण आता हा निर्णय लागू केल्याचा मला आनंद आहे.”

Web Title: Mobile phone ban on 'slave' set!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.