मिशाल पडला आजारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2016 10:31 IST2016-07-14T05:01:12+5:302016-07-14T10:31:12+5:30
इश्क का रंग सफेद या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारा मिशाल रहेजा हा प्रेक्षकांचा प्रचंड लाडका आहे. मिशाल काही दिवसांपासून ...

मिशाल पडला आजारी
इ ्क का रंग सफेद या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारा मिशाल रहेजा हा प्रेक्षकांचा प्रचंड लाडका आहे. मिशाल काही दिवसांपासून खूप आजारी आहे. मिशालला फूड पॉयझनिंग झाल्यामुळे त्याला काही दिवसांसाठी रुग्णालयात दाखलदेखील करण्यात आले होते. या कारणामुळे तो गेल्या कित्येक दिवसांपासून मालिकेचे चित्रीकरण करू शकला नव्हता. त्याला नुकतेच रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. घरी परतताच मिशालने दुसऱ्याच दिवसापासून चित्रीकरणाला पुन्हा सुुरुवातदेखील केली आहे. त्याची तब्येत बरी नसली तरी काम हे त्याचे पहिले कर्तव्य आहे असे त्याचे म्हणणे आहे.