मिर्झापूरच्या 'माधुरी भाभी'सोबत सेटवर घडली मोठी दुर्घटना; थेट डोळ्याला झाली दुखापत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2023 15:41 IST2023-05-13T15:39:04+5:302023-05-13T15:41:14+5:30
मिर्झापूरमध्ये 'माधुरी भाभी'ची भूमिका साकारून चाहत्यांना इम्प्रेस करणारी अभिनेत्री ईशा तलवार हिचा शूटिंगदरम्यान अपघात झाला.

मिर्झापूरच्या 'माधुरी भाभी'सोबत सेटवर घडली मोठी दुर्घटना; थेट डोळ्याला झाली दुखापत
'मिर्झापूर' (Mirzapur) या वेबसिरीजमध्ये 'माधुरी भाभी'ची भूमिका साकारून अभिनेत्री ईशा तलवार (Isha Talwar) चर्चेत आली. आता ती या शोच्या आगामी सीझनमध्ये म्हणजेच 'मिर्झापूर 3'मध्ये दिसणार आहे. तिने काही महिन्यांपूर्वीच या शोचे शूटिंग पूर्ण केले आहे. नुकताच तिचा 'सास बहू और फ्लेमिंगो' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. दरम्यान, अभिनेत्रीने खुलासा केला आहे की शूटिंगदरम्यान तिचा एक मोठा अपघात झाला होता, ज्यामुळे तिच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली होती.
ईशा तलवारने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एका प्रसिद्ध बातमीचा फोटो शेअर केला आहे. त्यात ईशाचे दोन फोटो आहेत. एकावर तिचा नॉर्मल फोटो तर दुसऱ्या फोटोत तिचा एकाच डोळा दिसतो. शूटिंगदरम्यान ईशाला तिला किती दुखापत झाली होती हे सांगितले. एकाच चित्रपटाचे शूटिंग सुरू होते आणि ते दृश्य squib machineच्या मदतीने शूट केले जात होते. हा एक अॅक्शन सीन होता आणि या मशीनमुळे अभिनेत्रीच्या डोळ्याला दुखापत झाली.
अभिनेत्री म्हणते की 'खूप अंधार होता आणि squib थेट माझ्या डोळ्यात आले. यामुळे माझा डोळा सुजला होता आणि मला तो उघडता येत नव्हता. अभिनेत्रीने सांगितले की तिचा सहकलाकार दीपक डोबरिया तिला दुसऱ्या दिवशी डॉक्टरांकडे घेऊन गेला. ईशाने सांगितले की यानंतर तीन दिवस तिनं शूट केलं नव्हतं. अभिनयच नाही, तर अभिनेत्रीने त्यात अॅक्शन सीनही शूट केले, निर्मात्यांनी नकार दिल्यानंतरही पडद्यावर सर्व काही ओरिजिनल दिसावे यासाठी अभिनेत्रीने हा धोका पत्करला.