बाबो..! मिका सिंगच्या 'स्वयंवर - मिका दी वोटी' शोच्या प्रोमोच्या शूटसाठी केले इतके कोटी खर्च
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 17:45 IST2022-05-12T17:44:59+5:302022-05-12T17:45:19+5:30
Mika Singh: मिका सिंगचे छोट्या पडद्यावर स्वयंवर रंगणार आहे. त्याचे चाहते त्याच्या या नव्या शोची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

बाबो..! मिका सिंगच्या 'स्वयंवर - मिका दी वोटी' शोच्या प्रोमोच्या शूटसाठी केले इतके कोटी खर्च
स्टार भारतवरील आगामी शो 'स्वयंवर - मिका दी वोटी'च्या खास प्रोमो शूटसाठी तयार केलेल्या मिका सिंग(Mika Singh)च्या संपूर्ण लुकची किंमत जवळपास रु. २.५ कोटी आहे. खास प्रोमो नुकताच पंजाब मधील चंदीगडजवळ शूट करण्यात आला. मिका सिंगने पंजाबी गेटअप केला होता ज्यामुळे त्याचा आतील 'पंजाबी मुंडा' दिसून आला. या ताज्या पंजाबी लूकने सिंगरच्या जीवनशैलीची झलक दाखवली.
मिका सिंग हा भारतातील सर्वात प्रभावशाली फॅशन आयकॉनपैकी एक आहे. तो वेगवेगळ्या शैलीचे कपडे घालतो. लवकरच तो स्टार भारतच्या आगामी 'स्वयंवर - मिका दी वोटी' शोमध्ये दिसणार आहे. या शोमधील स्वयंवरामध्ये सहभागी होणार आहे. शोमध्ये तो लग्न करणार नाही, पण एंगेजमेंट करणार आहे. त्यानंतर त्यांच्या नात्याला थोडा वेळ देऊन लग्नाचा विचार करणार आहे. या शोच्या शीर्षक ट्रॅक रिलीजची त्याचे चाहते वाट पाहत आहेत.
मिका सिंगच्या या शोच्या विशेष प्रोमो शूटवर जवळपास अडीच कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मिका फक्त लुई व्हिटॉनचे शूज घालतो आणि या शूटसाठी त्याने सुमारे ४.८ लाख किमतीचे शूज घातले होते. त्याच्या कस्टम मेड घड्याळाची किंमत १ कोटी आहे! लुई व्हिटॉन, एम्पोरियो अरमानी आणि मनीष मल्होत्रा यांसारख्या भारतीय डिझायनर कपड्यांचे वापर केल्यामुळे त्याची कपड्यांची निवड 'जेंटलमन' सारखी आहे. या सर्वांची किंमत २० ते २५ लाख रुपयांच्या पुढे गेली आहे. मिका सिंगच्या सनग्लासेसची किंमत १.५ लाखांपेक्षा जास्त आहे आणि त्याला गुच्ची आणि बलेंसियागा आवडतात. स्टार भारतच्या आगामी 'स्वयंवर - मिका दी वोटी' या शोचा हा बहुप्रतिक्षित विशेष प्रोमो पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत, जिथे आपण मिका सिंगला त्याच्या अप्रतिम अवतारात पाहू शकतो. मिका सिंग त्याच्या आगामी शो 'स्वयंवर - मिका दी वोटी' चे टायटल ट्रॅक लवकरच लाँच होणार आहे.