​सलमान खानच्या ‘दस का दम’साठी मिका सिंग करणार गाणं रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2018 13:30 IST2018-04-17T07:59:30+5:302018-04-17T13:30:10+5:30

सलमान खानने गेल्या काही वर्षांत मोठ्या पडद्याप्रमाणे छोट्या पडद्यावर देखील आपले एक स्थान निर्माण केले आहे. सलमानच्या चाहत्यांनी त्याला ...

Mika Singh's song for Salman Khan's 'Dus Ka Dum' record | ​सलमान खानच्या ‘दस का दम’साठी मिका सिंग करणार गाणं रेकॉर्ड

​सलमान खानच्या ‘दस का दम’साठी मिका सिंग करणार गाणं रेकॉर्ड

मान खानने गेल्या काही वर्षांत मोठ्या पडद्याप्रमाणे छोट्या पडद्यावर देखील आपले एक स्थान निर्माण केले आहे. सलमानच्या चाहत्यांनी त्याला एक सूत्रसंलाचकाच्या भूमिकेत देखील स्वीकारले आहे. सलमान खानने दस का दम या कार्यक्रमाद्वारे छोट्या पडद्यावर एंट्री केली होती. या कार्यक्रमाचे काही सिझन झाल्यानंतर या कार्यक्रमाला सलमानने रामराम ठोकला. त्यानंतर तो बिग बॉस या कार्यक्रमात व्यग्र झाला. बिग बॉस हा कार्यक्रम गेल्या अनेक सिझनमध्ये टिआरपीच्या रेसमध्ये अव्वल आहे. बिग बॉस नंतर आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकणार आहे. दस का दम या कार्यक्रमाचा नवा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या कार्यक्रमातही तो प्रेक्षकांना सूत्रसंचालनाच्या भूमिकेत दिसणार आहे.
दस का दम या कार्यक्रमाची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. या कार्यक्रमाचे टायटल साँग देखील तितकेच दमदार असावे यासाठी या कार्यक्रमाची टीम जोरदार प्रयत्न करत आहे. या कार्यक्रमाच्या यंदाच्या सिझनचे टायटल साँग आजचा आघाडीचा गायक मिका सिंह गाणार आहे. या शीर्षकगीताचा व्हिडिओ देखील लाँच होणार असून हा व्हिडिओ सलमान खानवर चित्रीत होणार आहे. या व्हिडिओत सलमान आपल्याला थिरकताना दिसणार आहे. हा व्हिडिओ प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी सगळ्यांना खात्री आहे. या शीर्षकगीताविषयी मिका सिंग सांगतो, दस का दमचे टायटल ट्रॅक गायला मला अतिशय आनंद होणार आहे. आम्ही गाण्याचे मूळ स्वरूप राखून ठेवले आहे आणि त्याला संपूर्ण नवीन कलाटणी आणि झिंग दिली आहे. सलमान भाईसाठी गाणे रेकॉर्ड करणे हे कायमच मजेशीर असते, कारण त्याच्या प्रमाणे त्याच्या गाण्यांना एका विशिष्ट ऊर्जा आवश्यक असते आणि मी त्याच्याशी संलग्न साधण्याचा नेहमी प्रयत्न करतो. सर्वाधिक भारतीयांप्रमाणेच मी देखील सलमानचा खूप मोठा फॅन आहे. तो मला माझ्या मोठ्या भावासारखा आहे आणि या गेम शोच्या पुनरागमनाची आणि सलमानच्या दस का दमचा 'कितने प्रतिशत भारतीय' या दमदार संवादाची मी आतुरतेने वाट बघतो आहे.
दस का दम या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनचे गाणे साजिद - वाजिदने रचले होते आणि आता आदिल-प्रशांतने हे गाणे नव्याने बनवले आहे.

Also Read : ​दस का दम या कार्यक्रमासाठी सलमान खानला मिळणार इतके मानधन...

Web Title: Mika Singh's song for Salman Khan's 'Dus Ka Dum' record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.