‘मिहिका’चा बॉयफ्रेंड आता ‘हुनार’सह अडकणार रेशीमगाठीत !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2016 11:57 IST2016-06-22T06:27:08+5:302016-06-22T11:57:08+5:30
टीव्ही अभिनेता आणि ‘स्पिल्ट्झव्हिला’-7 चा विजेता मयांक गांधी विवाहबंधनात अडकणार आहे.. ‘दहलीज’ या मालिकेची अभिनेत्री हुनार हाली हिला मयांक डेट करत असल्याचं ...

‘मिहिका’चा बॉयफ्रेंड आता ‘हुनार’सह अडकणार रेशीमगाठीत !
ट व्ही अभिनेता आणि ‘स्पिल्ट्झव्हिला’-7 चा विजेता मयांक गांधी विवाहबंधनात अडकणार आहे.. ‘दहलीज’ या मालिकेची अभिनेत्री हुनार हाली हिला मयांक डेट करत असल्याचं बोललं जात होतं.. अखेर मयांक आणि हुनारनं रेशीमगाठी अडकण्याचा निर्णय घेतलाय. ऑगस्ट महिन्याच्या 28 तारखेला दोघांचं शुभमंगल पार पडणार आहे.. 26 तारखेला कॉकटेल पार्टी आणि 27 ला संगीत सोहळा असेल अशी माहिती खुद्द हुनारनं दिलीय.. मयांकचं आधी ‘ये हे मोहब्बते’ या मालिकेच्या मिहिका वर्माशी अफेअर होतं.. दोघंही एकमेकांना बरीच वर्ष डेट करत होते.. मात्र एप्रिल-2016 मध्ये अमेरिकेच्या एका बिझनेसमनसोबत लग्न करुन मिहिकानं मयांक आणि तिच्या फॅन्सना धक्का दिला होता.. त्यानंतर एकट्या पडलेल्या मयांकला हुनारच्या रुपानं नवा आधार मिळाला आणि आता दोघंही आयुष्याभरासाठी नव्या बंधनात अडकणार आहे.. आम्ही तर दोघांनाही एवढंच सांगू की नांदा सौख्य भरे...