Mia Khalifaनं भारतात कधीच न परतण्याची घेतली होती शपथ, पैशांसाठी Bigg Boss OTT 2 मध्ये करणार एन्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2023 18:56 IST2023-06-17T18:56:15+5:302023-06-17T18:56:30+5:30
Mia Khalifa : मिया खलिफा 'बिग बॉस OTT 2' चा भाग होणार आहे. हे वृत्त समजल्यानंतर बिग बॉस OTT 2 बद्दल लोकांचा उत्साह आणखीनच वाढला आहे.

Mia Khalifaनं भारतात कधीच न परतण्याची घेतली होती शपथ, पैशांसाठी Bigg Boss OTT 2 मध्ये करणार एन्ट्री
'बिग बॉस ओटीटी १' (Bigg Boss OTT 1) ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पहिला सीझन निर्माता करण जोहरने होस्ट केला होता, परंतु लोकांच्या मागणीनंतर निर्मात्यांनी 'बिग बॉस ओटीटी २' (Bigg Boss OTT 2)साठी सलमान खानशी संपर्क साधला आणि सलमाननेही हा शो करण्यास होकार दिला. सलमान खान हा बिग बॉसचा खरा बादशाह आहे यात शंका नाही. या शोचे सूत्रसंचालन कोणीही करत असले तरी सलमानमुळे या शोला जी लोकप्रियता मिळते, ती इतर कोणालाही मिळू शकत नाही. यावेळी अनेक दिग्गज स्टार्स या शोमध्ये सहभागी होणार आहेत.
या शोमध्ये अनेक बॉलिवूड अभिनेत्रीही सहभागी होणार आहेत. या यादीत सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानी, ऐश्वर्या रायच्या दिसण्यासारखी स्नेहा उलाल अशा अनेक अभिनेत्रींच्या नावांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत आता या शोच्या संदर्भात एक रंजक नाव समोर आले आहे आणि ते म्हणजे माजी अॅडल्ट स्टार मिया खलिफा(Mia Khalifa)चे. बिग बॉस ओटीटी २ सीझनचा भाग होण्यासाठी मियाशी संपर्क साधण्यात आल्याचे बोलले जात आहे. यावर मियाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
मिया तिची शपथ मोडेल का?
जर मिया शोमध्ये आली तर या शोचा टीआरपी सर्व रेकॉर्ड मोडेल. शोचा भाग होण्यासाठी मिया मोठी रक्कम आकारू शकते. अशा परिस्थितीत मिया खलिफाचे एक जुने ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिने म्हटले होते की ती कधीही भारतात येणार नाही. अशा परिस्थितीत मिया तिची शपथ मोडेल का आणि बिग बॉस ओटीटी २ सीझनचा भाग बनेल का, असे प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होऊ लागले आहेत.
'बिग बॉस ओटीटी २' आजपासून भेटीला
'बिग बॉस ओटीटी २' आज म्हणजेच १७ जूनपासून सुरू होणार आहे. हा शो जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे. सनी लिओनही या शोचा एक भाग असणार आहे, पण ती स्पर्धक म्हणून नाही तर आणखी कोणत्या तरी कारणासाठी प्रवेश करणार आहे, याचे उत्तर आज रात्री मिळणार आहे.