​उल्का गुप्ता सांगतेय, छोट्या पडद्यावर काळ्या-गोऱ्याचा भेदभाव केला जातो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2017 12:52 IST2017-03-16T07:22:10+5:302017-03-16T12:52:10+5:30

उल्का गुप्ताने वीर शिवाजी, सात फेरे, खेलती है जिंदगी आँख में चोली, देवों के देव... महादेव यांसारख्या मालिकांमध्ये काम ...

Meteor Gupta says that black screen is discriminated against on small screens | ​उल्का गुप्ता सांगतेय, छोट्या पडद्यावर काळ्या-गोऱ्याचा भेदभाव केला जातो

​उल्का गुप्ता सांगतेय, छोट्या पडद्यावर काळ्या-गोऱ्याचा भेदभाव केला जातो

्का गुप्ताने वीर शिवाजी, सात फेरे, खेलती है जिंदगी आँख में चोली, देवों के देव... महादेव यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. पण खऱ्या अर्थाने तिला झांसी की राणी या मालिकेमुळे प्रसिद्धी मिळाली. या मालिकेत तिने झासी की राणीच्या लहानपणाची भूमिका साकारली होती. या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती दिली होती. 
उल्का आज छोट्या पडद्यापासून दूर असून मोठ्या पडद्यावर स्वतःचे भाग्य आजमावत आहे. सध्या ती रुद्रमादेवी या तमीळ चित्रपटात काम करत असून एका हिंदी आणि मराठी चित्रपटातदेखील झळकणार आहे. छोट्या पडद्यापासून दूर जाण्यामागे एक कारण असल्याचे ती सांगते. छोट्या पडद्यावर काळ्या-गोऱ्याचा भेदभाव केला जातो असे उल्काचे म्हणणे आहे. उल्काने याबाबत नुकताच खुलासा केला आहे. याविषयी उल्का सांगते, "मी सात वर्षांची असताना मला रंगभेदाचा सामना करावा लागला होता. मी रेशम डंक ही मालिका करत होती. पण या मालिकेला टिआरपी नसल्याने ही मालिका केवळ सहाच महिन्यात बंद झाली. मला नेहमीच अभिनयाची आवड होती. त्यामुळे रेशम डंक ही मालिका करत असतानाच मी अनेक ऑडिशन्स देत होती. या मालिकेचे चित्रीकरण संपल्यानंतर मी आणि माझे वडील ऑडिशन्सला जायचो. पण तिथे गेल्यानंतर सगळीकडेच मला नकार मिळत असे. कारण सगळे निर्माते त्यांच्या मालिकेत गोऱ्या मुलींच्याच शोधात असत. माझ्यात अभिनयक्षमता असूनदेखील केवळ माझ्या रंगामुळे मला अनेकवेळा नकार पचवावा लागला. सात फेरे या मालिकेत मी सलोनीच्या मुलीचे काम केले होते. ती भूमिका मला माझ्या रंगामुळेच मिळाली होती. या मालिकेने रंगभेदाचा विचार न करता मालिकेत कलाकारांची निवड केली याबद्दल त्यांचे नक्कीच कौतुक करणे गरजेचे आहे. निर्माते कास्टिंग एजंटला सांगतानाच त्यांना गोरी मुलगी पाहिजे आहे असे सांगत असत. त्यामुळे मी ऑडिशन्सना जाणेच बंद केले होते. रंग नव्हे तर माझ्या टायलेंटमुळे लोकांनी मला काम द्यावे अशी माझी इच्छा होती." 



Web Title: Meteor Gupta says that black screen is discriminated against on small screens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.