‘मेरी दुर्गा’च्या सेटवर लहानगी अनन्या बनली शेफ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2017 16:43 IST2017-02-24T11:13:50+5:302017-02-24T16:43:50+5:30

'मेरी दुर्गा' या मालिकेतील बालकलाकर अनन्या अगरवाल हिली आपण मास्टरशेफ इंडिया  पहिल्या सिझनची विजेती पंकज भदौरियासह अनन्या एका जाहिरातीत ...

'Mera Durga' set of little Ananya Chef! | ‘मेरी दुर्गा’च्या सेटवर लहानगी अनन्या बनली शेफ!

‘मेरी दुर्गा’च्या सेटवर लहानगी अनन्या बनली शेफ!

'
;मेरी दुर्गा' या मालिकेतील बालकलाकर अनन्या अगरवाल हिली आपण मास्टरशेफ इंडिया  पहिल्या सिझनची विजेती पंकज भदौरियासह अनन्या एका जाहिरातीत झळकत आहेत. या जाहिरातीतही तिला कुकींगमध्ये  रस असल्याचे जाणवते. आता छोट्या पडद्यावर अनन्या आता या मालिकेत शेफ बनणार आहे.आपल्या सहजसुंदर आणि समजून उमजून केलेल्या अभिनयाने अनन्याने वेळोवेळी रसिकांची मने जिंकली असली, तरी तिच्यातील एका सुप्त गुणाची माहिती फारशी कोणाला नाही.अनन्याला स्वयंपाक करायला फार आवडते आणि घरी गेल्यावर जर ती मित्रांबरोबर खेळत नसली, तर ती स्वयंपाकघरात मदत करीत असताना दिसते.तेव्हा आपल्यावर सतत विविध भेटवस्तू देणा-या मालिकेतील कलाकार व कर्मचा-यांना अनन्याने एक सुखद आश्चर्याचा धक्का देण्याचा निर्णय घेतला. अनन्याने एके दिवशी आपले सहकलाकार विकी आहुजा, राखी टंडन, अमरदीप झा आणि इतरांसाठी सेटवरच स्वत: पास्ता आणि पिझ्झा बनवला होता. या घटनेची माहिती देताना अनन्या म्हणाली, “मला स्वैपाक करायला खरंच खूप आवडतं. मी नेहमी घरी आईच्या मदतीने काही ना काही बनवीत असते. माझे सारे सहकलाकार इतके चांगले आहेत आणि ते माझी खूप काळजी घेत असतात, त्यामुळे मला त्यांच्यासाठी काहीतरी पदार्थ बनवायचा होता. त्यांना मी केलेला पास्ता आणि पिझ्झा खूप आवडला आणि मी असे पदार्थ वारंवार बनवावे, अशी मागणीही त्यांनी केली.”बाप आणि लेकीचं नाते, पित्याच्या लेकीकडून असलेल्या आशा-अपेक्षा यांचे हळूवार आणि तितकेच भावनिक दर्शन या मालिकेतून घडत असून पित्याचा लेकीसाठी,तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुरु असलेला संघर्ष रसिकांनाही सकारात्क दृष्टीकोण देण्यास मदशील ठरतो आहे. यशपाल चौधरी आणि दुर्गा या बाप लेकीच्या नात्याची ही कथा असेल. यातील यशपाल चौधरी हे अनंत अडचणी आणि बिकट आर्थिक परिस्थिती असतानाही लेकीच्या शिक्षणासाठी धडपड करतात एका बापाचे मुलीच्या शिक्षणासाठी सुरू असलेला संघर्ष मालिकेत मांडण्यात आला आहे.

Web Title: 'Mera Durga' set of little Ananya Chef!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.