'लागिरं झालं जी' मालिकेतील अजिंक्यची खरी गर्लफ्रेंड आहे 'ही' अभिनेत्री, सोशल मीडियावर शेअर केला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 15:53 IST2019-04-25T15:53:08+5:302019-04-25T15:53:41+5:30

काही महिन्यांपूर्वी अज्याने हा फोटो शेअर केला होता. हा फोटो पाहून अज्याचे चाहते संभ्रमात पडल्याचे पाहायला मिळाले.

Meet Lagira Zhala Jee Actor Nitish Chavan AKa Ajinkya Real Girlfriend, Photo Viral | 'लागिरं झालं जी' मालिकेतील अजिंक्यची खरी गर्लफ्रेंड आहे 'ही' अभिनेत्री, सोशल मीडियावर शेअर केला फोटो

'लागिरं झालं जी' मालिकेतील अजिंक्यची खरी गर्लफ्रेंड आहे 'ही' अभिनेत्री, सोशल मीडियावर शेअर केला फोटो

'लागिरं झालं जी' ही मालिका छोट्या पडद्यावर आता रंजक वळणावर आली आहे. मालिकेतील ट्विस्ट रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे.  या मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा रसिकांच्या मनात घर करण्यात यशस्वी ठरली आहे.    त्यातच मालिकेत अजिंक्य म्हणजेच अज्या आणि शीतली या दोघांना रसिकांनी भरभरून प्रेम दिले. ऑनस्क्रीन  अज्या आणि शितलीची रंगणारी लव्हस्टोरीने तर रसिकांची पसंतीची पावती मिळवली. अज्या अर्थात नितिश चव्हाण आणखीन एका कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याला कारणीभूत ठरला  आहे. अज्याचा हा खास फोटो.  

काही महिन्यांपूर्वी अज्याने हा फोटो शेअर केला होता. हा फोटो पाहून अज्याचे चाहते संभ्रमात पडल्याचे पाहायला मिळाले. अज्यासोबत फोटोत दिसणारी तरूणी आहे तरी कोण?असा प्रश्न अनेकांना पडला होता.फोटोमध्ये अजिक्यसोबत जी सुंदर मुलगी दिसते आहे तीच नाव आहे श्वेता खरात. नितीश चव्हाण आणि श्वेता खरात हे बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना ओळखतात. त्यामुळे श्वेता आणि नितीशचे अफेअर असल्याच्या चर्चा रंगत आहेत. सोशल मीडियावरील अकाऊंटवर पोस्ट करण्यात आलेल्या फोटोतून नितीश आणि श्वेता यांच्यात ‘चोरी चोरी चुपके चुपके’ अफेअर असल्याची  प्रचिती येते. 

रिल लाइफमध्ये शितलीवर लट्टू होणारा अज्याची श्वेताही  रिअल लाइफ शितली तर नाही अशा चर्चा सुरु झाल्या  असताना आता या फोटोचं वास्तव काय आहे हे फक्त अज्या (नितीश) लाच माहिती आहे. येत्या काळात या फोटोचे गुपितही नक्कीच समोर येईल. मात्र या बातमीमुळे रिअल लाइफ शितली बनण्याचं स्वप्न बघणा-या तरूणींचे हार्ट ब्रेक झालं असणार हे मात्र नक्की !

श्वेताही अभिनयक्षेत्रात आपले नशीब आजमवत आहे. 'तुला पण बाशिंग बांधायचंय” या सिनेमात श्वेता झळकली होती. 

Web Title: Meet Lagira Zhala Jee Actor Nitish Chavan AKa Ajinkya Real Girlfriend, Photo Viral