'तुला जपणार आहे' मालिकेच्या शूटदरम्यान मीरा उर्फ महिमाला झाली दुखापत, म्हणाली - "डोळ्याच्या अगदी जवळ..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 13:05 IST2025-12-20T13:04:51+5:302025-12-20T13:05:31+5:30
Mahima Mhatre : 'तुला जपणार आहे' या मालिकेत मीराची भूमिका अभिनेत्री महिमा म्हात्रे साकारते आहे. ती गेल्या काही दिवसांपासून मालिकेतून गायब होती. त्यानंतर अलिकडेच तिने मालिकेत कमबॅक केले. मालिकेत पुनरागमन केल्यानंतर मीराच्या नाकावर झालेली जखम आणि डोळ्यांचा बदललेल्या रंगाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतले आहे.

'तुला जपणार आहे' मालिकेच्या शूटदरम्यान मीरा उर्फ महिमाला झाली दुखापत, म्हणाली - "डोळ्याच्या अगदी जवळ..."
झी मराठी वाहिनीवरील 'तुला जपणार आहे' या मालिकेत मीराची भूमिका अभिनेत्री महिमा म्हात्रे साकारते आहे. ती गेल्या काही दिवसांपासून मालिकेतून गायब होती. त्यानंतर अलिकडेच तिने मालिकेत कमबॅक केले. मालिकेत पुनरागमन केल्यानंतर मीराच्या नाकावर झालेली जखम आणि डोळ्यांचा बदललेल्या रंगाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतले आहे. सोशल मीडियावर याबद्दल असंख्य प्रश्न विचारले जात आहे. त्यामुळे नुकतेच महिमाने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.
महिमा म्हात्रेने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, "नमस्कार, मी मीरा. आशा करते की तुम्ही सगळे मस्त असाल. आजचा हा व्हिडीओ बनवण्याचं कारण असं आहे की, तुमच्यापैकी अनेक जण मला मेसेज, डीएम किंवा कमेंट्स करून विचारतायत की, 'मीरा, तुझ्या नाकावर काय झालंय?' तर मला त्यांना सांगायचं आहे की, मालिका शूट करत असताना, ॲक्शन सीक्वन्स शूट करताना मी पडले आणि मला थोडं लागलंय. डॉक्टरांनी त्यावर लगेच मेकअप करू नये असा सल्ला दिला आहे आणि त्यांच्याच सल्ल्याने आम्ही आता पट्टी लावून शूट करतोय. इजा डोळ्यांच्या जवळ असल्यामुळे मला लेन्स लावता येत नाहीयेत, म्हणूनच मी माझ्या खऱ्या डोळ्यांनी शूट करतेय. त्यामुळे तुम्हाला मालिकेत हा नवीन लूक दिसतोय."
तिने पुढे म्हटले की, "त्याचबरोबर मला तुमचे खूप मनापासून आभार मानायचे आहेत, कारण मी मध्यंतरी एपिसोड्समध्ये दिसत नव्हते, तेव्हा सुद्धा तुम्ही खूप मेसेज केले, खूप कमेंट्स केल्या, खूप डीएम्स आले मला की, 'मीरा तू कुठे आहेस? बरी आहेस ना? लवकर ये, आम्ही तुझी वाट पाहतोय.' या सगळ्यातून मला तुमचं प्रेम कळत होतं आणि तुमचे मेसेज वाचून खूप छान वाटत होतं. मला माहिती आहे की यापूर्वी तुम्ही मीरावर खूप प्रेम केलंय आणि मीरा मधला हा छोटासा बदल स्वीकारून तुम्ही तिच्यावर आधीपेक्षाही जास्त प्रेम कराल. त्याचबरोबर आपल्या मालिकेत आता नवनवीन ट्विस्ट तर येतच आहेत, त्यामुळे तुमचं मनोरंजन तर होणारच आहे. थँक्यू सो मच, इतक्या प्रेमासाठी आणि काळजीसाठी! धन्यवाद."