लेकीच्या जन्माच्या ७ महिन्यानंतर मीनाक्षी राठोडचं टेलिव्हिजनवर कमबॅक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 18:25 IST2023-01-16T18:24:35+5:302023-01-16T18:25:00+5:30
Meenakshi Rathod : सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील देवकीच्या भूमिकेतून अभिनेत्री मीनाक्षी राठोड घराघरात पोहचली.

लेकीच्या जन्माच्या ७ महिन्यानंतर मीनाक्षी राठोडचं टेलिव्हिजनवर कमबॅक
सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Kay Asata) मालिकेतून अभिनेत्री मीनाक्षी राठोड (Meenakshi Rathod) घराघरात पोहचली. या मालिकेत तिने देवकीची भूमिका साकारली होती. तिने साकारलेली ही भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. मीनाक्षीने तिच्या अभिनयानं सर्वांची मने जिंकली होती. मात्र डिलिव्हरीमुळे तिला मालिका अर्ध्यावर सोडावी लागली. त्यानंतर तिच्या जागी भक्ती रत्नपारखी या भूमिकेत पाहायला मिळाली. मीनाक्षी प्रेग्नंसीच्या काळात शेवटच्या महिन्यापर्यंत मालिकेचे शूटिंग करत होती. मुलीच्या जन्मानंतर मीनाक्षीने कामातून ब्रेक घेतला होता. मात्र आता ती पुन्हा जोमाने कामाला लागली आहे. ती नव्या मालिकेतून कमबॅक करते आहे. ही माहिती खुद्द तिनेच सोशल मीडियावर दिली आहे.
मीनाक्षी राठोड हिने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती निळ्या रंगाच्या साडीत दिसते आहे आणि तिच्या हातात स्क्रीप्टही पाहायला मिळते आहे. तिने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, लो फिर आगये हम. स्वागत नहीं करोगे. कब कहाँ जल्द ही बतायेंगे.
मीनाक्षी राठोडच्या या पोस्टवर चाहत्यांसह सेलिब्रेटीही शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. तिचे चाहते तिला पुन्हा तू सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत कमबॅक करते आहेस का, असे विचारत आहेत. मात्र नेमकी ती कोणत्या मालिकेत दिसणार आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही.
मीनाक्षी आणि तिचा नवरा अभिनेता कैलास वाघमारेला मे महिन्यात मुलगी झाली. दोघांनी सोशल मीडियावर मुलीचा फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांनी दिली होती. मीनाक्षी आणि कैलास नेहमीत मुलीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. मीनाक्षीच्या युट्यूब चॅनेलवर ती मुलीबरोबरचे व्लॉग्स शेअर करत असते.