'माझ्या नवऱ्याची बायको' फेम रूचिरा जाधवची बहिण अडकली लग्नबेडीत, दिसायला आहे लयभारी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2021 19:41 IST2021-12-11T19:41:22+5:302021-12-11T19:41:48+5:30
अभिनेत्री रुचिरा जाधव (Ruchira Jadhav) हिच्या सख्ख्या बहिणीचा विवाह सोहळा नुकताच संपन्न झाला.

'माझ्या नवऱ्याची बायको' फेम रूचिरा जाधवची बहिण अडकली लग्नबेडीत, दिसायला आहे लयभारी!
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका माझ्या नवऱ्याची बायको (Mazya Navryachi Bayko)ने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी आजही या मालिकेतील सर्वच पात्रे प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात आहेत. या मालिकेत मायाची भूमिका अभिनेत्री रूचिरा जाधव (Ruchira Jadhav) हिने साकारली होती. रूचिराने वेबसीरिज आणि मालिकांमधून रसिकांच्या मनात घर केले आहे. नुकतेच रूचिराच्या सख्ख्या बहिणीचा विवाह सोहळा संपन्न झाला. तिची बहिणदेखील तिच्यासारखी दिसायला सुंदर आहे.
ऋतुजा जाधव ही रुचिरा जाधवची सख्खी बहीण आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच ३ जानेवारी रोजी ऋतुजा आणि अंकित ढगे यांचा साखरपुडा पार पडला होता. साखरपुडा निमित्त मराठी कलाकारांनी या दोघांनाही भरभरून शुभेच्छा दिल्या होत्या. साखरपुड्यानंतर डिसेंबर महिन्यात हे दोघेही विवाहबद्ध झाले आहेत. अंकित ढगे शेफ आणि एक सोशल वर्कर आहे. तो मुंबईत स्थायिक आहे.
ऋतुजा आपल्या बहिणीप्रमाणेच कला क्षेत्राशी निगडित आहे. एक फॅशन मॉडेल म्हणून ती मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत आहे. फ्लेमिंगो या प्रसिद्ध फिटनेस ब्रँड प्रॉडक्ट्ससाठी तिने काम केले आहे.
तुझ्या वाचून करमेना या मालिकेतून रुचिराने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. या मालिकेत तिने नुपूरची भूमिका साकारली होती. शुद्ध देसी या युट्युब चॅनेलवरील ‘माझ्या मित्राची गर्लफ्रेंड’ या वेबसिरीज खेरीज ‘प्रेम हे’ झी युवा, ‘बे दुणे दहा’ स्टार प्रवाह, ‘माझे पती सौभाग्यवती’ अशा बऱ्याच मालिकेत ती काम करताना दिसली.