'नवीन सुरूवात!', 'माझ्या नवऱ्याची बायको'मधील गुरूनाथने दिली चाहत्यांना ही गुड न्यूज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 13:30 IST2021-09-20T13:29:44+5:302021-09-20T13:30:11+5:30

नुकतेच अभिजीत खांडकेकर आणि सुखदाने चाहत्यांना सोशल मीडियावर आनंदाची वार्ता सांगितली आहे.

Mazya Navryachi Bayko Fame Gurunath Aka Abhijeet Khandkekar shared good news | 'नवीन सुरूवात!', 'माझ्या नवऱ्याची बायको'मधील गुरूनाथने दिली चाहत्यांना ही गुड न्यूज

'नवीन सुरूवात!', 'माझ्या नवऱ्याची बायको'मधील गुरूनाथने दिली चाहत्यांना ही गुड न्यूज

'माझ्या नवऱ्याची बायको'मधील गुरूनाथच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता अभिजीत खांडकेकर आणि त्याची पत्नी अभिनेत्री सुखदा खांडकेकर सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. ते दोघे सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. तसेच या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असतात. नुकतेच अभिजीत खांडकेकर आणि सुखदाने चाहत्यांना सोशल मीडियावर आनंदाची वार्ता सांगितली आहे. ही बातमी जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल ना. अभिजीत आणि सुखदाने नवीन घर घेतले असल्याचे सोशल मीडियावर सांगितले आहे.

अभिजीत खांडकेकर याने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले की, आणि आम्ही हो म्हटलं...आमच्या नवीन पत्त्याला. आमच्या नवीन भिंती आम्हाला आनंद देतील. प्रत्येक खोली हास्य फुलवेल आणि प्रत्येक खिडकी मोठ्या शक्यतेसाठी खुली आहे.


माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर आता अभिजीत खांडकेकर सोनी मराठी वाहिनीवरील क्रिमिनल्स चाहूल गुन्हेगारांची या मालिकेत पहायला मिळतो आहे. या मालिकेत तो सूत्रसंचालन करताना दिसतो आहे. तर सुखदा खांडकेकर सध्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या मालिकेत काम करताना दिसते आहे. ती या मालिकेत द्वारकाबाईंची भूमिका साकारते आहे. 


अभिजीत आणि सुखदा १ फेब्रुवारी २०१३ रोजी लग्नबेडीत अडकले. नाशिकमध्ये त्यांचे लग्न मोठ्या धुमधडाक्यात पार पडले होते.

अभिजीत आणि सुखदा दोघांनीही मालिकेशिवाय चित्रपटात काम केलेले आहे. या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. सोशल मीडियावरील त्यांच्या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसते.

Web Title: Mazya Navryachi Bayko Fame Gurunath Aka Abhijeet Khandkekar shared good news