'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत रुसलेल्या नेहाचा राग घालवण्यासाठी मेहंदी कार्यक्रमात आलेले 'ते' खास पाहुणे कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 14:07 IST2022-06-08T13:48:21+5:302022-06-08T14:07:57+5:30
Mazi Tuzi Reshimgath :नेहा आणि यशाच्या लग्नाची चर्चा सर्वत्र चालू आहे. नेहा आणि यशाच्या लग्नसोहळ्याचा थाट काही वेगळाच आहे.

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत रुसलेल्या नेहाचा राग घालवण्यासाठी मेहंदी कार्यक्रमात आलेले 'ते' खास पाहुणे कोण?
छोट्या पडद्यावर काही महिन्यांपूर्वीच सुरु झालेली लोकप्रिय मालिका म्हणजे माझी तुझी रेशीमगाठ. या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. त्यामुळे या मालिकेच्या प्रत्येक भागाचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. सध्या या मालिकेत नेहा आणि यश यांच्या लग्नाची लगबग सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. नेहा आणि यशाच्या लग्नाची चर्चा सर्वत्र चालू आहे. नुकताच यश आणि नेहाचा साखरपुडा पार पडला. नेहा आणि यशाच्या लग्नसोहळ्याचा थाट काही वेगळाच आहे.
या सोहळ्याच्या आधी सगळे कार्यक्रम देखील अगदी दिमाखदार पद्धतीने पार पडणार आहेत. आता प्रेक्षक मालिकेत पाहू शकतील कि साखरपुड्या नंतर यशचे मित्र बॅचलर पार्टी करायचं ठरवतात. शेफालीला याची खबर मिळते. ती समीरवर नजर ठेवण्यासाठी नेहाला तिथे घेऊन जाते. पण काही गैरसमजामुळे यश मुलींच्या गराड्यात अडकलेला नेहा पाहाते आणि रुसून निघून जाते. रुसलेल्या नेहाचा राग घालवण्यासाठी काही खास पाहुणे मेहंदीच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
दरम्यान, सिल्वासामध्ये हा लग्नसोहळा रंगणार असून सध्या मालिकेत या सोहळ्याचं चित्रीकरण पार पडत आहे. इतकंच नाही तर या लग्नात एक ट्विस्टही पाहायला मिळणार आहे. साखरपुड्यात यशच्या हातात एक नव्हे तर २ अंगठ्या पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे हा संपूर्ण आठवडा प्रेक्षकांसाठी नक्कीच मनोरंजनाचा ठरणार आहे.