'माझी तुझी रेशीमगाठ'मधील छोट्या परीचा बेस्ट फ्रेंड ओजस आहे 'या' अभिनेत्याचा मुलगा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 14:19 IST2022-05-19T14:01:29+5:302022-05-19T14:19:45+5:30
'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tuzi Reshimgaath Serial) या मालिकेतील परीचा बेस्ट फ्रेंड ओजस स्टार किड्स आहे. त्याचे वडील देखील अभिनेते आहेत.

'माझी तुझी रेशीमगाठ'मधील छोट्या परीचा बेस्ट फ्रेंड ओजस आहे 'या' अभिनेत्याचा मुलगा
माझी तुझी रेशीमगाठ (Majhi Tuzi Reshimgaath Serial) या मालिकेनं कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील यश आणि नेहा यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. तसेच छोट्या परीनेदेखील अल्पावधीतच घराघरात आपलं स्थान निर्माण केले आहे. या मालिकेत परी आणि ओजसची चांगली गट्टी जमलेली दाखवण्यात आली आहे. परीचा बेस्ट फ्रेंड ओजस स्टार किड्स आहे. त्याचे वडील देखील अभिनेते आहेत.
परीचा मित्र ओजसची भूमिका बालकलाकार कृष्णा महाडीक (Krishna Mahadik) या बालकलाकाराने साकारली आहे. माझी तूझी रेशीमगाठ ही कृष्णाची पहिलीच मालिका आहे. या मालिकेतून प्रसिद्धी मिळालेल्या कृष्णाला नुकतेच पेटीएमच्या जाहिरातीत झळकण्याची संधी मिळाली. कृष्णाचे वडील अभिजित महाडीक (Abhijit Mahadik) हे देखील अभिनेते आहेत.
अभिजित महाडीक यांनी हिंदी मराठी मालिकांमधून लहान मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. सध्या स्टार प्रवाहवरील फुलाला सुगंध मातीचा या लोकप्रिय मालिकेतून ते आयपीएस विनायक माने यांची भूमिका साकारताना दिसत आहेत. नवे लक्ष्य, जय जय स्वामी समर्थ, स्वराज्यजननी जिजामाता, सोन्याची पावलं, स्पेशल पोलीस फोर्स, नमक ईस्क का, मोलकरीण बाई, डॉ बाबासाहेब आंबेडकर अशा मालिकांमधून अभिजित महाडिक यांनी विविध भूमिका साकारलेल्या आहेत.
वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत कृष्णाला देखील अभिनयाची आवड निर्माण झाली. या दोघांनी गेल्या वर्षभरापासून अनेक रिल्स व्हिडीओ सादर केले आहेत. सोशल मीडियावर यांचे रिल्स नेहमी चर्चेत असतात. कृष्णा देखील परीसारखा सोशल मीडिया स्टार आहे. यामुळेच त्याला मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. सध्या परीप्रमाणे कृष्णा देखील त्याच्या निरागस अभिनयाने रसिकांचे मन जिंकताना दिसत आहे.