माया माझी प्रेरणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2016 12:20 IST2016-09-21T06:50:06+5:302016-09-21T12:20:06+5:30
बहू हमारी रजनि_कांत या मालिकेत शोगता श्रीमंतीचा माज असलेली, अतिशय गर्विष्ठ स्त्री दाखवली आहे.तसेच ही सतत दुसऱ्यांच्या चुका दाखवणारी, ...

माया माझी प्रेरणा
ब ू हमारी रजनि_कांत या मालिकेत शोगता श्रीमंतीचा माज असलेली, अतिशय गर्विष्ठ स्त्री दाखवली आहे.तसेच ही सतत दुसऱ्यांच्या चुका दाखवणारी, स्वतःला शहाणी समजणारी आहे. ही व्यक्तिरेखा काहीशी साराभाई व्हर्सेस साराभाई या मालिकेतील माया साराभाईप्रमाणे आहे. मायाची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. शोगताची भूमिका साकारण्याासाठी नेहा कौलला माया या भूमिकेकडून प्रेरणा मिळाली असल्याचे ती सांगते. या भूमिकेविषयी नेहा सांगते, "माया साराभाई या व्यक्तिरेखेची मी चाहती असून ही मालिका मी अनेक वर्षं पाहात आहे. शोगता या भूमिकेविषयी मला सांगण्यात आले तेव्हा मला सगळ्यात पहिल्यांदा मायाचीच आठवण आली. मी पहिल्या दिवसांपासूनच या भूमिकांमधील साम्य शोधायला सुरुवात केली. मी मायाची नक्कल केली नसली तरी शोगता ही भूमिका साकारण्यासाठी माया हीच माझी प्रेरणा ठरली."