'मे आय कम इन,मॅडम?'च्या सेटवर नेहा पेंडसेसाठी अवतरले चक्क दोन दोन सांता !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2016 15:32 IST2016-12-23T15:32:23+5:302016-12-23T15:32:23+5:30

दिवाळी असो वा पाडवा, ख्रिसमस असो किंवा न्यु इअर छोट्या पडद्यावर प्रत्येक सण उत्साहात  साजेर होतात. सध्या ख्रिसमस फिव्हर ...

'May I Come In, Madam?', Neha Pendse is set to get two two Santa! | 'मे आय कम इन,मॅडम?'च्या सेटवर नेहा पेंडसेसाठी अवतरले चक्क दोन दोन सांता !

'मे आय कम इन,मॅडम?'च्या सेटवर नेहा पेंडसेसाठी अवतरले चक्क दोन दोन सांता !

वाळी असो वा पाडवा, ख्रिसमस असो किंवा न्यु इअर छोट्या पडद्यावर प्रत्येक सण उत्साहात  साजेर होतात. सध्या ख्रिसमस फिव्हर सगळ्या मालिकांमध्येही पाहायला मिळतो.‘मे आय कम इन, मॅडम?’मालिकेतही नायकाची भूमिका करणारा अभिनेता संदीप आनंद याने आजवर मालिकेत इतकी विविध रूपे घेतली आहेत, की संदिपसाठी हाताच्या बोटावर मोजणेही अशक्य आहे.आता मालिकेच्या आणखी एका आगामी विनोदी भागात संदीपने सांताक्लॉजचा वेश परिधान केला आहे.पडद्यावरील आपली बॉस नेहा पेंडसे हिला आश्चर्याचा धक्का देण्यासाठी संदीपने सांताक्लॉजचे रूप घेतले असले,तरी या कथेत एक नवीन आश्चर्य दडलेले आहे.

मालिकेत नेहा पेंडसे खराखुरा सांताक्लॉज पाहण्याची इच्छा व्यक्त करते.तेव्हा संदिप आनंद स्वत:च सांताक्लॉजचे रूप घेण्याचा निर्णय घेतो. पण या साध्या वाटणा-या कथेत काही अनपेक्षित वळणे आहेत. ही कलाटणी अशी की नेहासमोर एक नव्हे,तर दोन दोन सांताक्लॉज येतात ! नेहाने सांताक्लॉजला बघण्याची इच्छा आपल्या वडिलांकडेही बोलून दाखविलेली असते,त्यामुळे तेही तिला खुश करण्यासाठी स्वत:च सांताक्लॉज बनून येतात.याबद्दल संदीपने सांगितले, “मला लहानपणापासून सांताक्लॉजचा लाल झगा, त्याची रेनडिअरची गाडी, बर्फातून केलेली सफर यांचं आकर्षण होतं. पण ‘मुलांच्या चेह-यावर हासू निर्माण करा, त्यांना आनंद द्या’ हा सांताक्लॉजचा खरा संदेश आहे.मीसुध्दा विनोदी मालिकांतून प्रेक्षकांच्या चेह-यावर हास्य निर्माण करत असतो. आता या मालिकेत सांताक्लॉजचा वेश करून मीही प्रेक्षकांना आनंदाची काही क्षण  मिळवून देणार आहे. या भागाचं चित्रीकरण करताना मालिकेच्या सर्व टीमने मजा मस्ती करत ख्रिसमसचे दणक्यात सेलिब्रेशन केले.


Web Title: 'May I Come In, Madam?', Neha Pendse is set to get two two Santa!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.