लेकासह 'मास्टरशेफ'मध्ये पोहोचली कोळीणबाय, नलिनी काकूंचं फ्राय केलेलं पापलेट खाऊन विकास खन्ना खूश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 15:55 IST2026-01-11T15:53:09+5:302026-01-11T15:55:45+5:30
लोकप्रिय कंटेट क्रिएटर नलिनी काकू यांनीदेखील त्यांच्या मुलासह 'मास्टरशेफ ऑफ इंडिया'ची ऑडिशन दिली आहे.

लेकासह 'मास्टरशेफ'मध्ये पोहोचली कोळीणबाय, नलिनी काकूंचं फ्राय केलेलं पापलेट खाऊन विकास खन्ना खूश
Masterchef Of India: 'मास्टरशेफ ऑफ इंडिया'चा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यंदाच्या सीझनमध्ये कुकिंग पार्टनरसोबत स्पर्धकांना सहभागी होता येणार आहे. काही मराठी चेहरेदेखील यंदाच्या 'मास्टरशेफ ऑफ इंडिया'मध्ये दिसण्याची शक्यता आहे. मराठी इन्फ्लुएन्सर अर्चना धोत्रे 'मास्टरशेफ ऑफ इंडिया'मध्ये पोहोचली. तिच्या ऑडिशनचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. आता लोकप्रिय कंटेट क्रिएटर नलिनी काकू यांनीदेखील त्यांच्या मुलासह 'मास्टरशेफ ऑफ इंडिया'ची ऑडिशन दिली आहे.
सोनी टीव्हीच्या ऑफिशियल सोशल मीडिया हँडलवरुन एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये नलिनी काकू आणि त्यांचा मुलगा मल्हार ही मराठमोळी मायलेकाची जोडी 'मास्टरशेफ ऑफ इंडिया'मध्ये पोहोचली आहे. नलिनी काकू आणि मल्हार यांनी त्यांची स्पशेल डिश पापलेट आणि कोळंबी फ्राय परिक्षकांना खाऊ घातली. फ्राय पापलेट खालून परिक्षक खूश झाल्याचं व्हिडीओत दिसत आहे. विकास खन्ना आणि रणवीर ब्रार त्यांचं कौतुकही करताना दिसत आहेत. त्यानंतर नलिनी काकू आणि मल्हार मराठी गाण्यावर त्या परीक्षकांनाही डान्स करायला लावतात.
'मास्टरशेफ ऑफ इंडिया'ची पहिली फेरी ही नलिनी काकू आणि मल्हारने पार केली आहे. आता पुढच्या टप्प्यात ते कोणती डिश बनवून प्रेक्षकांना खूश करणार हे पाहावं लागेल. 'मास्टरशेफ ऑफ इंडिया'चा हा नवा सीझन ५ जानेवारीपासून सुरू झाला असून सोमवार ते शुक्रवारी रात्री ९ वाजता प्रेक्षकांना सोनी टीव्ही या चॅनेलवर पाहता येणार आहे.