​मास्टर शेफ विजेती किर्ती भोटिकाचे झाले विमानतळावरच जय्यत स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2016 17:24 IST2016-12-28T17:24:57+5:302016-12-28T17:24:57+5:30

मास्टर शेफचा विजेता कोण ठरणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली होती. यंदाचा मास्टर शेफचा किताब कोलकताच्या किर्ती भोटिकाने मिळवला. आतापर्यंतच्या ...

Master Chef winner Kirti Bhatika made the welcome at the airport | ​मास्टर शेफ विजेती किर्ती भोटिकाचे झाले विमानतळावरच जय्यत स्वागत

​मास्टर शेफ विजेती किर्ती भोटिकाचे झाले विमानतळावरच जय्यत स्वागत

स्टर शेफचा विजेता कोण ठरणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली होती. यंदाचा मास्टर शेफचा किताब कोलकताच्या किर्ती भोटिकाने मिळवला. आतापर्यंतच्या सगळ्या सिझनमधली विजेत्यांमध्ये किर्ती वयाने सगळ्यात लहान आहे. 
किर्ती मास्टर शेफचे विजेतेपद मिळवल्यानंतर कोलकताला नुकतीच परतली. त्यावेळी विमानतळावरच तिच्या कुटुंबियांनी आणि फ्रेंड्सनी तिचे जय्यत स्वागत केले. याविषयी किर्ती सांगते, "मी मास्टर शेफमध्ये भाग घ्यावा हे माझ्या पालकांचे स्वप्न होते. मी स्वतः कधी मास्टर शेफचा विचार केला नव्हता. मागच्या सिझनच्या ऑडिशनच्यावेळी माझे पालक मी ऑडिशनला जावी यासाठी माझ्या मागे लागले होते. पण त्यावेळी माझी परीक्षा असल्याने मी त्याकडे दुर्लक्ष केले. पण यंदाच्या ऑडिशनला मी गेले आणि मी पासदेखील झाले. जेवण बनवण्याची मला लहानपणापासूनच आवड आहे. केक बनवणे हा तर माझा छंद आहे. मी केवळ 12-13 वर्षांची असल्यापासूनच केक बनवायला सुरुवात केली. मी केकची पाककृती नेटवर पाहून अथवा टिव्हीवरील कुकरी शोमध्ये पाहून केक करत असे. माझी ही आवड पाहून माझ्या आई-वडिलांनी मला केक बनवण्याच्या वर्कशॉपलादेखील टाकले होते. माझे केक आमच्या नातलगांना, फ्रेंड्सना फार आवडत असल्याने मला केकच्या ऑडर्स मिळू लागल्या आणि नंतर कॉलेजमध्ये असताना मी माझी एक छोटीशी बेकरी सुरू केली. या सगळ्यात माझ्या कुटुंबियांचा मला पाठिंबा मिळाला. आता मास्टर शेफचे विजेतेपद मिळाल्यानंतर मी माझ्या बेकरीचा विस्तार करणार आहे. तसेच केक बनवण्याचे वर्कशॉपदेखील सुरू करणार आहे. केक बनवणे हे सोपे नसते. मी जेव्हा सुरुवातीला केक बनवायची, त्यावेळी अनेकवेळा माझे केक बिघडायचे. त्यामुळे आता ज्यांना केक बनवण्याची आवड आहे, त्यांना मदत करण्याचे मी ठरवले आहे. मास्टर शेफ या कार्यक्रमामुळे मला एक खूप मोठा फायदा झाला. मी शाकाहारी असल्याने मांसाहारी जेवण बनवण्याचा कधी प्रश्नच आला नव्हता. पण एक शेफ म्हणून तुम्हाला सगळे काही बनवता आले पाहिजे असे मला वाटते. त्यामुळे मी या कार्यक्रमात मांसाहारी जेवण बनवायलादेखील शिकले. या गोष्टीचा मला माझ्या भविष्यात नक्कीच फायदा होईल." 

Web Title: Master Chef winner Kirti Bhatika made the welcome at the airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.