'मस्त गर्ल' रवीना टंडनने भाऊ कदमसह असा धरला ठेका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2017 13:17 IST2017-04-14T07:40:19+5:302017-04-14T13:17:57+5:30
'चला हवा येवू द्या'च्या मंचावर आजवर अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी हजेरी लावत रसिकांचे मनोरंजन केले आहे. विशेष म्हणजे याच मंचावर ...

'मस्त गर्ल' रवीना टंडनने भाऊ कदमसह असा धरला ठेका
' ;चला हवा येवू द्या'च्या मंचावर आजवर अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी हजेरी लावत रसिकांचे मनोरंजन केले आहे. विशेष म्हणजे याच मंचावर मराठी नववर्षाची सुरुवात बॉलिवूडचा मि.परफेक्शनिस्ट आमिर खाने गुढी आभारून केली होती. त्यानंतर आता बॉलिवूडची मस्त गर्ल रवीन टंडन या मंचावर रसिकांनी हसून हसून लोटपोट करताना दिसणार आहे. आपल्या अभिनयाने आणि नृत्याच्या अदाकारीने चित्रपट रसिकांची मने जिंकणारी बॉलिवडची मस्त गर्ल अशी ओळख असणारी रवीना टंडन ब-याच वर्षानंतर ‘मातृ’ या हिंदी चित्रपटातून कमबॅक करतेय. हा सिनेमा लवकरच प्रदर्शित असून प्रमोशनसाठी रवीनाने या मंचावर हजेरी लावली होती. अतिशय संवेदनशील अशा विषयावर आधारित ‘मातृ’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रवीनाने थुकरटवाडीची वाट धरली. यावेळी तिच्यासोबत या चित्रपटात काम केलेली मराठमोळी अभिनेत्री दिव्या जगदाळेसुद्धा उपस्थित होती. मस्त गर्ल थुकरटवाडीत येणार म्हटल्यावर धम्माल होणार नाही हे तर होवूच शकत नाही रवीनासोबत थुकरटवाडीच्या मंडळींनी म्हणजेच भाऊ कदमने तर रवीना सह 'तू चीज बडीं है मस्त मस्त'' या गाण्यावर ताल धरला तर कुशल बद्रिकेनेही रवीनासह डान्स करत धमाल केल्याचे पाहायला मिळाले. या खास भागात रवीना मराठीत रसिकांशी संवादही साधणार असून मराठीतच आपल्या सिनेमाची माहिती देणार आहे.तसेच नेहमी या मंचावर कॉमेडी स्कीट सादर करण्यात येते. त्यानुसार रवीनाच्या सिनेमावर आधारित एक कॉमेडी स्कीटही सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे 'चला हवा येऊ द्याचा हा आगामी भाग रसिकांसाठी एक मनोरंजनाची ट्रीट ठरणार हे मात्र नक्की.
![]()
![]()
![]()