"मसूद अजहर-हाफिज सईद बिनधास्त फिरत आहेत...", 'गोपी बहू'नं पाकिस्तानला दाखवला आरसा, म्हणाली - युद्ध व्हायलाच पाहिजे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 09:22 IST2025-05-10T09:20:15+5:302025-05-10T09:22:19+5:30

छोट्या पडद्यावरील गोपी बहू म्हणजेच अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) हिने पुन्हा एकदा पोस्ट शेअर करत भारताचे समर्थन केले आहे आणि पाकिस्तानाला आरसा दाखवला आहे.

''Masood Azhar-Hafiz Saeed are roaming freely...'', 'Gopi Bahu' Aka Devoleena Bhattacharjee showed a mirror to Pakistan, said - there must be a war... | "मसूद अजहर-हाफिज सईद बिनधास्त फिरत आहेत...", 'गोपी बहू'नं पाकिस्तानला दाखवला आरसा, म्हणाली - युद्ध व्हायलाच पाहिजे...

"मसूद अजहर-हाफिज सईद बिनधास्त फिरत आहेत...", 'गोपी बहू'नं पाकिस्तानला दाखवला आरसा, म्हणाली - युद्ध व्हायलाच पाहिजे...

पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत आहे. अशा परिस्थितीत सिनेइंडस्ट्रीतील काही कलाकार सातत्याने पोस्ट शेअर करून भारताचा पाठिंबा देत आहेत आणि पाकिस्तानवर निशाणा साधत आहेत. दरम्यान नुकतेच छोट्या पडद्यावरील गोपी बहू म्हणजेच अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) हिने पुन्हा एकदा पोस्ट शेअर करत भारताचे समर्थन केले आहे आणि पाकिस्तानाला आरसा दाखवला आहे.

देवोलिना भट्टाचार्जी गेल्या काही दिवसांपासून भारत-पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या मुद्द्यावर आपले मत व्यक्त करत आहेत. आता तिने सोशल मीडिया अकाउंट X वर पोस्ट शेअर करत दाऊद इब्राहिम, मौलाना मसूद अजहर, हाफिज सईदचा उल्लेख केला आहे. देवोलिना सोशल मीडियावर अकाउंटवर पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने लिहिलंय की, शांतता एक सुंदर विचार आहे, पण एकतर्फी शांततेची आशा नाही. कित्येक वर्षांपासून भारताने दुःख, चिथावणी आणि रक्तपात सहन केले आहे. या हल्ल्यांच्या मागे मास्टरमाइंड दाऊद इब्राहिम, मौलाना मसूद अजहर, हाफिज सईद आणि इतर काहींना पाकिस्तानचे संरक्षण आहे आणि ते बिनधास्त फिरत आहेत. 

''युद्ध अपरिहार्य आहे''
तिने पुढे म्हटलं की, आम्ही वाट पाहिली, आम्ही बोललो, आम्हाला आशाही होती. पण वाट पाहण्याची किंमत काय मिळाली? आणखी किती जीव? 
कारवाईला विलंब करणे म्हणजे युद्ध टाळणे नाही. ते अधिक दुःखांना आमंत्रण देत आहे. आपण गोलगोल फिरणे थांबवले पाहिजे. हिशोब करण्याची वेळ जवळ आली आहे. युद्ध अपरिहार्य आहे. मागे हटणे नाही. आपल्या सशस्त्र दलांसह आपल्या देशासोबत खांद्याला खांदा लावून उभे राहण्याची ही वेळ आहे. शांतता चर्चा स्मार्ट वाटू शकतात, कदाचित ट्रेंडी आणि कूलदेखील पण आपण स्वतःला फसवू नये. जय हिंद. 

नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला केलं ट्रोल
देवोलिनाच्या या पोस्टवर बऱ्याच नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. एका युजरने लिहिले की, वेडी झालीय बिचारी, कोणी देशद्रोही नका म्हणू हिला युद्ध हवंय. तर दुसऱ्या युजरने म्हटले की, बहिण जा ना बॉर्डरवर, जाऊन लढ. एसी रुममध्ये बसून ट्विट करते आहे.

Web Title: ''Masood Azhar-Hafiz Saeed are roaming freely...'', 'Gopi Bahu' Aka Devoleena Bhattacharjee showed a mirror to Pakistan, said - there must be a war...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.