"शोनंतर लग्न नक्की...", जन्नत जुबैरला डेट करतोय फैसल शेख, फराह खानने दिली मोठी हिंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 17:36 IST2025-02-28T17:35:51+5:302025-02-28T17:36:52+5:30
Faisal Sheikh : मिस्टर फैझू म्हणून ओळखला जाणारा सोशल मीडिया इन्फ्ल्युन्सर फैजल शेख सध्या सेलिब्रिटी मास्टरशेफ शोमध्ये दिसत आहे.

"शोनंतर लग्न नक्की...", जन्नत जुबैरला डेट करतोय फैसल शेख, फराह खानने दिली मोठी हिंट
मिस्टर फैझू म्हणून ओळखला जाणारा सोशल मीडिया इन्फ्ल्युन्सर फैजल शेख (Faisal Sheikh) सध्या सेलिब्रिटी मास्टरशेफ शोमध्ये दिसत आहे. मिस्टर फैजू कुकिंगचं कौशल्य दाखवताना दिसत आहे. या अभिनेत्याचे सोशल मीडियावर खूप फॉलोअर्स आहेत. याशिवाय तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. फैजल टेलिव्हिजनवरील अभिनेत्री जन्नत जुबेर(Jannat Jubair)सोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा बऱ्याच दिवसापासून ऐकायला मिळत आहे.
जन्नत जुबेर फैसल शेखपेक्षा सात वर्षांनी लहान आहे. दोघांना अनेकदा एकत्र पाहिले गेले आहे, पण दोघांनीही कधीच त्यांच्या नात्याची पब्लिकली पुष्टी केलेली नाही. पण एका हिंटनंतर फराह खानने त्यांच्या डेटिंगच्या वृत्ताला दुजोरा दिल्याचे समजते. नुकत्याच प्रसारीत झालेल्या एका एपिसोडमध्ये, फैसल शेख दीपिका कक्करसोबत पार्टनर चॅलेंजमध्ये होता. या दरम्यान दोघेही हेल्दी डिश तयार करतात. फैजल खजूर न वापरता ही डिश तयार करतो, त्यानंतर विकास खन्ना त्याला विचारतो, 'डेट्स कुठे आहेत?' यावर फराह गमतीने म्हणते, 'त्याच्याकडे डेट्स नाहीत.' शेफ रणवीर ब्रार मागून म्हणतो, 'फैजू, तो इतका व्यस्त आहे की त्याच्याकडे डेटसाठी वेळ नाही.' यानंतर फराहने फैजलने तयार केलेल्या डिशचे कौतुक केले आणि म्हणाली की, ती मस्करी करत होती. आता आई विचारेल, अजून काय चांगलं बनवता येते?
मी तुझे लग्न लावून राहीन - फराह
फैजू म्हणाला, 'हो, या शोनंतर मी नक्की लग्न करेन.' यावर फराहने उत्तर दिले की, 'या शोनंतर मी तुझे लग्न लावेन, तुला जन्नतच्या सहलीला घेऊन जाईन.' फराहच्या तोंडून जन्नतचे नाव ऐकताच फैजू ब्लश करू लागला. शेजारी उभी असलेली दीपिका सुद्धा तिला सर्व काही माहीत असल्यासारखे भासवू लागली. फैजू आणि जन्नत जुबेर यांनी अनेक प्रोजेक्टमध्ये एकत्र काम केले आहे. ते सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे अनेक फोटोही शेअर करतात ज्यामुळे ते एकमेकांना डेट करत असल्याचा अंदाज त्यांच्या चाहत्यांनी लावला आहे.