धीरज धूपर प्रेयसी विन्नी अरोडासह विवाहबंधनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2016 16:55 IST2016-11-18T16:55:55+5:302016-11-18T16:55:55+5:30

'ससुराल सिमर का' फेम धीरज धूपरने प्रेयसी विन्नी अरोडासह विवाहबंधनात अडकला. पजाबी पध्दतीने थाटात या दोघांचेही लग्नसोहळा पार पडला. ...

Marriage with endurance Dhonoor Priyanka Vinnie Arora | धीरज धूपर प्रेयसी विन्नी अरोडासह विवाहबंधनात

धीरज धूपर प्रेयसी विन्नी अरोडासह विवाहबंधनात

'
;ससुराल सिमर का' फेम धीरज धूपरने प्रेयसी विन्नी अरोडासह विवाहबंधनात अडकला. पजाबी पध्दतीने थाटात या दोघांचेही लग्नसोहळा पार पडला. गेल्या 7 वर्षापासून धीरज आणि विन्नी एकमेकांना ओळखतात. 'माता पिता के चरणों में स्वर्ग' या मालिकेत दोघांनी एकत्र कामही केले आहे. गेल्या 7 वर्षापासून आम्ही आमच्या लग्नाचे स्वप्न पाहात होतो आणि आज स्वप्न सत्यात उतरले.आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि आनंदाचा हा क्षण आम्ही दोघेही एन्जॉय करत असल्याचे धीरजने सांगितले. आम्ही दोघांनी एकमेकांच्या आवडीनिवडीनुसार लग्नाची शॉपिंग केली. लग्नाची शॉपिंग करणे म्हणजेच धावपळ असते मात्र आम्ही दोघांनी आमच्या लग्नाची तयारीही एन्जॉय केली असे विन्नीने सांगितले.विशेष म्हणजे लग्नमंडपात विन्नीला आपल्यामुळे वाट पाहावी लागु नये म्हणून धीरज अर्ध्या तासात तयारी केली,स्वतःचा मेकअप स्वतःकरत लग्नमंडपात हजेरी लावली.या दोघांनाही आशिर्वाद देण्यासाठी टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकारांनीही हजेरी लावली होती.  

Web Title: Marriage with endurance Dhonoor Priyanka Vinnie Arora

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.