मंदना करिमी दिसणार 'या' मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2018 06:30 IST2018-08-31T13:43:47+5:302018-09-02T06:30:00+5:30

‘इश्कबाझ' मालिकेला लवकरच आणखी एक नवे वळण मिळाल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मोहित आणि नॅन्सी या दाम्पत्याचा ओबेरॉय कुटुंबियांच्या जीवनात प्रवेश होणार आहे

Marda Karimi will appear in the 'this' series | मंदना करिमी दिसणार 'या' मालिकेत

मंदना करिमी दिसणार 'या' मालिकेत

ठळक मुद्देमोहितला धोका पत्करायला आवडतोमोहित आणि नॅन्सी या दाम्पत्याचा ओबेरॉय कुटुंबियांच्या जीवनात प्रवेश होणार आहे

‘स्टार प्लस’वरील ‘इश्कबाझ’ या मालिकेच्या कथानकाला मिळणाऱ्या अनपेक्षित कलाटण्यांमुळे प्रेक्षकांची या मालिकेतील उत्सुकता कायम राहिली आहे. आता या मालिकेला लवकरच आणखी एक नवे वळण मिळाल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मोहित आणि नॅन्सी या दाम्पत्याचा ओबेरॉय कुटुंबियांच्या जीवनात प्रवेश होणार आहे. नॅन्सीच्या भूमिकेत मंदना करिमी आणि मोहितच्या भूमिकेतील झेन इमाम हे आपल्या आकर्षक व्यक्तित्त्वाने छोट्या पडद्यावर नवी खळबळ उडवितील.

या मालिकेत ही पाहुण्या कलाकारांची भूमिका रंगविण्याची संधी मिळाल्याबद्दल हे दोघे अभिनेते उत्साही बनले आहेत. झेन इमामने सांगितले,“नामकरण मालिकेनंतर मला इश्कबाझच्या निमित्ताने पुन्हा एकदा स्टार प्लसच्या कुटुंबात प्रवेश मिळाल्याबद्दल मी आनंदी आणि आभारी आहे. मी आतापर्यंत टीव्हीवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा यातील मोहितची व्यक्तिरेखा अगदी वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. मोहितला धोका पत्करायला आवडतो. त्याचं व्यक्तिमत्त्व देखणे, शैलीदार असून आपली पत्नी नॅन्सी (मंदाना करिमी) हिच्या प्रेमात आकंठ बुडालेला असतो. तिच्या सुखासाठी काहीही करण्याची त्याची तयारी असते. माझ्या व्यक्तिरेखेभोवती असलेलं गूढ आणि धडाडीचा स्वभाव यामुळे मी ही भूमिका लगेच स्वीकारली आणि मालिकेच्या आगामी भागांत प्रेक्षकांना काही थरारक प्रसंग पाहायला मिळतील.”

नॅन्सीची व्यक्तिरेखा रंगविणारी मंदना करिमी म्हणाली,“इश्कबाझ या टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय मालिकेचा एक भाग बनता आल्यामुळे मी अतिशय आनंदात आहे. हिंदी मनोरंजन मालिकांमध्ये मी प्रथमच भूमिका साकारत असून मला ही भूमिका मिळाल्याबद्दल मी स्वत:ला अतिशय सुदैवी समजते. मालिकेत माझ्या पतीच्या भूमिकेत झेन इमाम आहे. तो एक अप्रतिम अभिनेता असून मला त्याच्याबरोबर एकत्र भूमिका साकारायची आहे, असं कळल्यावर मी खूपच उत्सुक झाले आहे. माझी नॅन्सीची व्यक्तिरेखा सुंदर आणि मादक असून मी माझ्या पतीवर निरतिशय प्रेम करते, असं दाखविण्यात आलं आहे. नॅन्सीचं हे मादक, फॅशनेबल व्यक्तिमत्त्व आणि तिच्या भूमिकेला असलेले विविध पदर बघून मी ही भूमिका स्वीकारली.”

Web Title: Marda Karimi will appear in the 'this' series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.