मराठमोळी ही अभिनेत्री नुकतीच बनली आई, तिचा नवरादेखील आहे प्रसिद्ध अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 13:05 IST2021-11-15T13:04:31+5:302021-11-15T13:05:13+5:30

मराठी आणि हिंदी छोट्या पडद्यावरील या प्रसिद्ध अभिनेत्रीने नुकतीच तिच्या चाहत्यांना खुशखबर दिली आहे.

Marathmoli actress recently became a mother, her husband is also a famous actor | मराठमोळी ही अभिनेत्री नुकतीच बनली आई, तिचा नवरादेखील आहे प्रसिद्ध अभिनेता

मराठमोळी ही अभिनेत्री नुकतीच बनली आई, तिचा नवरादेखील आहे प्रसिद्ध अभिनेता

मराठी आणि हिंदी छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री खुशबू तावडे हिने नुकतीच तिच्या चाहत्यांना खुशखबर दिली आहे. तिने २ नोव्हेंबर २०२१ रोजी तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला असून त्याच नाव राघव असल्याचे तिने सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून सांगितले आहे. खुशबु तावडे असे देखील म्हणाली की आम्हाला निवडल्याबद्दल धन्यवाद. अभिनेत्री खुशबू तावडे हिने ५ मार्च २०१८ रोजी अभिनेता संग्राम साळवीसोबत लग्नगाठ बांधली. बालदिनाचे औचित्य साधून दोघांनी देखील ही सुखद बातमी चाहत्यांना दिली आहे.

अभिनेता संग्राम साळवीने नुकताच बाबा बनला असल्याचे सांगितले आहे. स्टार प्रवाहवरील ‘देवयानी’ या मालिकेतून संग्रामने मुख्य भूमिका साकारली होती. तुमच्यासाठी काय पण …हा मालिकेतला डायलॉग देखील त्यावेळी खूपच गाजला होता. त्यानंतर त्याने काही मालिका आणि चित्रपट देखील केले आहेत. पण तुमच्यासाठी कायपण हा त्याचा डायलॉग आज देखील प्रसिद्ध आहे. संग्राम साळवी हा मूळचा कोल्हापूरचा. कामानिमित्त तो आपल्या कुटुंबासोबत मुंबईत स्थायिक झाला. दगडाबाईची चाळ, कुलस्वामिनी, सरस्वती, पन्हाळा आणि आई माझी काळूबाई अशा चित्रपट आणि मालिकेतूनही त्याने भूमिका साकारल्या आहेत. संग्रामाची पत्नी अभिनेत्री खुशबु तावडे हीदेखील मराठीतील नव्हे तर हिंदी मालिकांतील लोकप्रिय चेहरा आहे. तिने प्यार की एक कहाणी, आम्ही दोघी, तू भेटशील नव्याने, पारिजात, तेरे लिये, मेरे साई, देवयानी, तारक मेहता का उलटा चश्मा या मालिकेत महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.


काही वर्षांपूर्वी अभिनेता संग्राम साळवी आणि अभिनेत्री खुशबू तावडे यांनी मुंबईत ‘साईड वॉक कॅफे’ या नावाने स्वतःचे कॅफे सुरू करून व्यवसाय क्षेत्रात पाऊल टाकले. अभिनेत्री खुशबू तावडे हिची बहीण देखील मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तितिक्षा तावडे ही अभिनेत्री खुशबू तावडे हिची सख्खी बहीण आहे. तू अशी जवळी राहा, असे हे कन्यादान, सरस्वती यांसारख्या मालिकांत तिने काम केले आहे. 

Web Title: Marathmoli actress recently became a mother, her husband is also a famous actor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.