किचन कल्लाकारमध्ये मोठा बदल; लवकरच सुरु होणार 'हा' नवा कुकरी शो?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 18:10 IST2022-03-11T18:08:20+5:302022-03-11T18:10:02+5:30
Kitchen kallakar: हा शो अल्पावधीत लोकप्रिय झाला असून आता त्यात काही बदल करण्यात आले आहेत.

किचन कल्लाकारमध्ये मोठा बदल; लवकरच सुरु होणार 'हा' नवा कुकरी शो?
काही दिवसांपूर्वीच छोट्या पडद्यावर 'मस्त मजेदार किचन कल्लाकार' ( Kitchen Kallakar) हा नवा कुकरी शो सुरु झाला आहे. या कार्यक्रमात अभिनेता प्रशांत दामले (Prashant Damle)परिक्षकाच्या भूमिकेत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर अभिनेता संकर्षण क-हाडे सूत्रसंचालकाची भूमिका बजावत आहे. हा शो अल्पावधीत लोकप्रिय झाला असून आता त्यात काही बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे हा शो प्रेक्षकांचा निरोप घेतो की काय असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
सध्या सोशल मीडियावर या कार्यक्रमाचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये 'किचन कल्लाकार'ऐवजी आता 'मसालेदार किचन कल्लाकार' हा नवा शो सुरु होणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत. मात्र, किचन कल्लाकार हा शो प्रेक्षकांचा निरोप घेणार नसून त्याऐवजी आता त्याचा दुसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
व्हायरल होत असलेल्या प्रोमोमध्ये प्रशांत दामले आणि संकर्षण क-हाडे पोवाड्याच्या माध्यमातून नव्या भागाची घोषणा करत आहेत. यात नव्या पर्वाचं नाव मसालेदार किचन कल्लाकर असं असणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
दरम्यान, किचन कल्लाकार या कार्यक्रमाने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली आहे. आतापर्यंत या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटी स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. या कार्यक्रमात सेलिब्रिटींना काही भन्नाट पदार्थ तयार करायचा टास्क देतात.