'चला हवा येऊ द्या' मधून 'या' कलाकाराने घेतली एक्झिट?; आता झळकणार 'किचन कल्लाकार'मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 11:56 AM2022-01-14T11:56:10+5:302022-01-14T11:57:05+5:30

Chala hawa yeu dya: गेल्या कित्येक वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं अविरतपणे मनोरंजन करत आहे. त्यामुळे या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात एक हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.

marathi tv show chala hawa yeu dya fame actor exit the show | 'चला हवा येऊ द्या' मधून 'या' कलाकाराने घेतली एक्झिट?; आता झळकणार 'किचन कल्लाकार'मध्ये

'चला हवा येऊ द्या' मधून 'या' कलाकाराने घेतली एक्झिट?; आता झळकणार 'किचन कल्लाकार'मध्ये

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणजे 'चला हवा येऊ द्या' (chala hawa yeu dya). गेल्या कित्येक वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं अविरतपणे मनोरंजन करत आहे. त्यामुळे या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात एक हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. श्रेया बुगडे( shreya bugade), भाऊ कदम (bhau kadam), कुशल बद्रिके (kushal badrike), निलेश साबळे (nilesh sable) ही कलाकार मंडळी प्रेक्षकांना त्यांच्या कुटुंबातीलच एक भाग वाटतात. परंतु, आता या कार्यक्रमातून एक लोकप्रिय कलाकार एक्झिट घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट मोठी व्हायरल होत आहे.

सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टनुसार, लवकरच अभिनेत्री श्रेया बुगडे या कार्यक्रमातून एक्झिट घेणार आहे. मात्र, तिचीही एक्झिट काही काळासाठीच असणार आहे. त्यानंतर ती पुन्हा चला हवा येऊ द्याच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज होणार आहे.

प्रकाशझोतापासून दूर आहे निलेश साबळेची पत्नी; पाहा कशा दिसतात Mrs. Sable

सूत्रांच्या माहितीनुसार, श्रेया बुगडे लवकरच किचन कल्लाकार या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. काही दिवसांपूर्वीच छोट्या पडद्यावर किचन कल्लाकार हा कुकरी शो सुरु झाला आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संकर्षण कऱ्हाडे करत आहे. परंतु, काही काळासाठी संकर्षण या कार्यक्रमातून ब्रेक घेणार आहे. त्यामुळे त्याला पर्यायी म्हणून श्रेया या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे.

दरम्यान, श्रेया बुगडे काही काळासाठीच या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. परंतु, श्रेया किंवा संकर्षण या दोघांकडून याविषयी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 

Web Title: marathi tv show chala hawa yeu dya fame actor exit the show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.