Bigg Boss Marathi 3 Episodes, 3 oct: कोण स्वीकारणार पाच लाखांची ऑफर? कोणाचा संपेल प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 18:24 IST2021-10-03T18:24:03+5:302021-10-03T18:24:43+5:30

Bigg boss marathi 3: शनिवार-रविवारी होणाऱ्या बिग बॉसच्या चावडीवर महेश मांजरेकर घरातील प्रत्येकाची शाळा घेतात. यावेळीदेखील त्यांनी घरातील अनेकांची शाळा घेतली आहे.

marathi tv show bigg boss marathi season 3 mahesh manjrekar offer 5 lakh rupees | Bigg Boss Marathi 3 Episodes, 3 oct: कोण स्वीकारणार पाच लाखांची ऑफर? कोणाचा संपेल प्रवास

Bigg Boss Marathi 3 Episodes, 3 oct: कोण स्वीकारणार पाच लाखांची ऑफर? कोणाचा संपेल प्रवास

ठळक मुद्देआता मांजरेकरांनी दिलेली ही ऑफर घरातील कोणता सदस्य स्वीकारतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच चर्चिला जाणारा शो म्हणजे बिग बॉस मराठी. यंदा या शोचं तिसरं पर्व सुरु असून आता या घरातील टास्क चांगलेच रंगताना दिसत आहेत. त्यातच दर शनिवार-रविवारी होणाऱ्या बिग बॉसच्या चावडीवर महेश मांजरेकर घरातील प्रत्येकाची शाळा घेतात. यावेळीदेखील त्यांनी घरातील अनेकांची शाळा घेतली आहे. इतकंच नाही तर, आता ते या घरातील सदस्यांसमोर एक ऑफर ठेवणार आहेत.
ज्या स्पर्धकांना 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडायचं आहे त्यांच्यासाठी महेश मांजरेकरांनी एक नवीन ऑफर दिली आहे. त्यानुसार, या स्पर्धकांसमोर पाच लाखांची पेटी ठेवली जाणार आहे. ज्यांना या शोमधून बाहेर पडायचं आहे त्यांनी पाच लाख रुपये घेऊन बाहेर पडायचं आहे.

'बिग बॉस'च्या चावडीवर आज हा नवा भाग रंगणार आहे. यात महेश मांजरेकर घरातील सदस्यांसमोर  एक सूटकेस ठेवणार आहेत.या सूटकेसमध्ये पाच लाख रुपये असून जे स्पर्धक ही रक्कम घेतली त्यांना हे घर सोडावं लागेल असं मांजरेकर सांगताना दिसणार आहेत.

रंग माझा वेगळा:  जयवंत वाडकरांच्या लेकीला मिळाली होती दिपाची भूमिका; 'या' कारणामुळे नाकारली ऑफर

दरम्यान, आता मांजरेकरांनी दिलेली ही ऑफर घरातील कोणता सदस्य स्वीकारतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. परंतु, हा भागाचा उलगडा आजच्या 'बिग बॉस'च्या चावडीवरच होणार आहे. 
 

Web Title: marathi tv show bigg boss marathi season 3 mahesh manjrekar offer 5 lakh rupees