अखेर अनिरुद्ध पडणार एकटा; अरुंधतीच्या घरी साजरं होणार देशमुखांचं रक्षाबंधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 16:00 IST2022-08-11T16:00:00+5:302022-08-11T16:00:00+5:30
Aai kuthe kay karte: रक्षाबंधनाच्या दिवशी घरातील सगळी मंडळी अरुंधतीच्या घरी जातात आणि मोठ्या थाटात हा दिवस साजरा करतात. मात्र, संपूर्ण देशमुख कुटुंब अरुंधतीकडे गेल्यामुळे अनिरुद्ध एकटा पडतो.

अखेर अनिरुद्ध पडणार एकटा; अरुंधतीच्या घरी साजरं होणार देशमुखांचं रक्षाबंधन
'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) ही मालिका दिवसेंदिवस रंजक वळणं घेत आहे. आतापर्यंत या मालिकेत प्रत्येक सण, उत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. काही दिवसांपूर्वीच देशमुखांच्या घरात संजना आणि अनघाची पहिली मंगळागौर साजरी करण्यात आली. त्यानंतर आता या कुटुंबात रक्षाबंधनही साजरं केलं जाणार आहे. परंतु, यावेळी
सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी घरातील सगळी मंडळी अरुंधतीच्या घरी जातात आणि मोठ्या थाटात हा दिवस साजरा करतात. मात्र, संपूर्ण देशमुख कुटुंब अरुंधतीकडे गेल्यामुळे अनिरुद्ध एकटा पडतो आणि त्याला त्याच्या एकटेपणाची जाणीव होते.
दरम्यान, सणासुदीच्या दिवशी मुलांना पाहावसं वाटतं असं अरुंधती केदारला सांगते. आणि, त्याचवेळी अरुंधतीची मुलं तिच्या घरी येतात. विशेष म्हणजे मुलांनी दिलेलं हे सरप्राइज अरुंधतीला प्रचंड आवडतं. पण, घरी थांबलेला अनिरुद्ध मात्र एकटा पडतो. आता या मालिकेत पुढे काय होणार? अनिरुद्धदेखील अरुंधतीच्या घरी जाणार का? संजना त्याची साथ देईल का? हे येत्या भागातच प्रेक्षकांना कळणार आहे.