'नशा ये प्यार का नशा हैं'! राणादाचा 'या' अभिनेत्रीसोबत रोमॅण्टिक व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 13:20 IST2021-09-29T13:16:14+5:302021-09-29T13:20:15+5:30

Hardik joshi: 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेच्या यशानंतर हार्दिक 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे.

marathi tv serial tuzya mazya sansarala ani kay hava hardik joshi and romantic video viral | 'नशा ये प्यार का नशा हैं'! राणादाचा 'या' अभिनेत्रीसोबत रोमॅण्टिक व्हिडीओ व्हायरल

'नशा ये प्यार का नशा हैं'! राणादाचा 'या' अभिनेत्रीसोबत रोमॅण्टिक व्हिडीओ व्हायरल

ठळक मुद्देहार्दिकने शेअर केलेल्या व्हिडीओमुळे अनेकांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या आहेत. 

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे हार्दिक जोशी. या मालिकेत हार्दिकने राणादा ही भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं. त्यामुळे आज राणा अनेक तरुणींच्या गळ्यातलं ताईत झाला आहे. परंतु, अलिकडेच हार्दिकने एका अभिनेत्रीसोबत रोमॅण्टिक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर हार्दिकची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेच्या यशानंतर हार्दिक 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. या मालिकेतील अनेक अपडेट्स तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्यातच त्याने शेअर केलेल्या व्हिडीओमुळे अनेकांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या आहेत. 

हार्दिकने इन्स्टाग्रामवर एक रोमॅण्टिक व्हिडीओ शेअर केला असून 'नशा ये प्यार का नशा है' या गाण्यावर तो रोमॅण्टिक अंदाजात असल्याचं दिसून येतं आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री अमृता पवार झळकली आहे.

बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वीच 'या' स्पर्धकाला आला पॅनिक अटॅक

दरम्यान, अमृता पवार ही मराठी कलाविश्वातील नावजलेली अभिनेत्री असून सध्या ती 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकत आहे.
 

Web Title: marathi tv serial tuzya mazya sansarala ani kay hava hardik joshi and romantic video viral