ठिपक्यांची रांगोळी: शरद पोंक्षेंनी सोडली मालिका; 'हा' अभिनेता साकारणार दादा काकांची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 12:59 IST2023-07-24T12:59:04+5:302023-07-24T12:59:45+5:30

Thipkyanchi Rangoli: मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता आता दादा काकांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

marathi tv serial Thipkyanchi Rangoli sharad ponkshe uday tikekar | ठिपक्यांची रांगोळी: शरद पोंक्षेंनी सोडली मालिका; 'हा' अभिनेता साकारणार दादा काकांची भूमिका

ठिपक्यांची रांगोळी: शरद पोंक्षेंनी सोडली मालिका; 'हा' अभिनेता साकारणार दादा काकांची भूमिका

छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे ठिपक्यांची रांगोळी. अल्पावधीत या मालिकेने प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. त्यामुळे या मालिकेतील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांना आपलासा वाटतो. परंतु, आता या मालिकेतून अभिनेता शरद पोंक्षे यांनी काढता पाय घेतला आहे. त्यांनी दादा काकांची भूमिका सोडली आहे. त्यामुळे सध्या चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. परंतु, शरद पोंक्षेंनी ही मालिका सोडल्यानंतर या भूमिकेत आता एक नवीन अभिनेता झळकणार आहे.

या मालिकेतील माई, अपूर्वा,शशांक, सुमी या कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं आहे. तर, दादा काका ही भूमिका साकारुन शरद पोंक्षे यांनी पुन्हा प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. ही मालिका सुरु झाल्यापासून शरद पोंक्षे ही भूमिका साकारत होते. मात्र, आता त्यांनी ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
शरद पोंक्षे यांच्या ऐवजी आता या मालिकेत अभिनेता उदय टिकेकर दादा काकांची भूमिका साकारणार आहे. उदय टिकेकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये याविषय़ीची पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. तसंच ठिपक्यांची रांगोळीच्या एका फॅनपेजवरही शेअर करण्यात आलं आहे.

दरम्यान,  उदय टिकेकर यांना दादा काकांच्या भूमिकेत पाहायला प्रेक्षक उत्सुक आहेत. उदय टिकेकर मराठीतला नावाजलेला अभिनेता असून त्यांनी अनेक मालिका, सिनेमांमध्ये काम केलं आहे. तसंच ते हिंदी मालिकांमध्येही काम करताना दिसून येतात.
 

Web Title: marathi tv serial Thipkyanchi Rangoli sharad ponkshe uday tikekar