मोरे ब्रदर्सचा स्वॅग एकदा पाहाच; जेजुरीत 'सहकुटुंब सहपरिवार'चं हटके फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 06:45 PM2022-06-10T18:45:00+5:302022-06-10T18:45:01+5:30

Sahakutumb sahaparivar: अभिनेता अक्षय नलावडे याने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये सगळे मोरे ब्रदर्स मोठ्या ऐटीत फोटोसाठी पोझ देत असल्याचं पाहायला मिळत आहे.

marathi tv serial sahakutumb sahaparivar more brothers swag | मोरे ब्रदर्सचा स्वॅग एकदा पाहाच; जेजुरीत 'सहकुटुंब सहपरिवार'चं हटके फोटोशूट

मोरे ब्रदर्सचा स्वॅग एकदा पाहाच; जेजुरीत 'सहकुटुंब सहपरिवार'चं हटके फोटोशूट

googlenewsNext

छोट्या पडद्यावर सध्या तुफान गाजत असलेली मालिका म्हणजे 'सहकुटुंब सहपरिवार' (sahakutumb sahaparivar). आतापर्यंत या मालिकेत अनेक चढउतार आले. मात्र, संपूर्ण कुटुंबाने एकत्रपणे या संकटांवर मात केली. मोरे कुटुंबात ज्योती आल्यामुळे संपूर्ण कुटुंब विखुरलं होतं. मात्र, सरुने घरात पाय ठेवताच सगळी परिस्थिती पूर्वीसारखी झाली. सरुमुळे संपूर्ण कुटुंब पुन्हा एकत्र आलं. यामध्येच मोरे ब्रदर्सचा भन्नाट स्वॅग पाहायला मिळाला.

सध्या या मालिकेत संपूर्ण मोरे कुटुंबीय जेजुरीला खंडेरायाच्या दर्शनाला गेल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे या मालिकेच्या सेटवरील अनेक फोटो कलाकारांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्येच अभिनेता अक्षय नलावडे याने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये सगळे मोरे ब्रदर्स मोठ्या ऐटीत फोटोसाठी पोझ देत असल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, हा फोटो शेअर करत मोरे ब्रदर्स असं कॅप्शन अक्षयने दिलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर मोरे ब्रदर्सचा स्वॅग अशी चर्चा रंगली आहे. सध्या या मालिकेत रंजकादर वळण आलं आहे. संपूर्ण कुटुंब एकत्र आलं आहे. मात्र, सरु, अवनी आणि अंजीने ज्या पद्धतीने ज्योतीला घराबाहेर काढलं त्याचा बदला घेण्यासाठी ज्योती प्रयत्न करत आहे. त्यामुळे आता ज्योती कोणती नवी खेळी खेळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
 

Web Title: marathi tv serial sahakutumb sahaparivar more brothers swag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.