Video: कार्तिकी-दीपिकाला वेगळं केल्यामुळे दिपा घडवणार आयशाला अद्दल; लगावणार जोरदार कानशिलात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 12:14 IST2022-02-18T12:13:33+5:302022-02-18T12:14:12+5:30
Rang maza wegla: कार्तिकी आणि दीपिका यांच्यातील अबोला वाढल्यामुळे दीपिका आता कायमची अमेरिकेला जाणार हे कार्तिकी दिपाला सांगते.

Video: कार्तिकी-दीपिकाला वेगळं केल्यामुळे दिपा घडवणार आयशाला अद्दल; लगावणार जोरदार कानशिलात
छोट्या पडद्यावरील रंग माझा वेगळा ही मालिका सध्या रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून विभक्त राहत असलेले कार्तिक-दिपा त्यांच्या लेकींमुळे जवळ येत आहेत. कार्तिकी आणि दीपिका यांची मैत्री झाल्यापासून त्या एक दिवसही एकमेकींशिवाय वेगळ्या राहिल्या नाहीत. मात्र, त्यांच्या मैत्रीत आयशाने फूट पाडली आहे. विशेष म्हणजे आयशामुळे कार्तिकी-दीपिकाची मैत्री तुटल्याचं दिपाच्या लक्षात आल्यानंतर तिने आयशाला चांगली अद्दल घडवली आहे.
सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये दिपा, आयशाला कार्तिकी आणि दीपिकाला वेगळं का केलंस असा जाब विचारते. यावर आयशा उडवाउडवीची उत्तरं देते. हे पाहिल्यावर दिपा जोरदार तिच्या कानाखाली लगावणार आहे.
दरम्यान, कार्तिकी आणि दीपिका यांच्यातील अबोला वाढल्यामुळे दीपिका आता कायमची अमेरिकेला जाणार हे कार्तिकी दिपाला सांगते. त्यावर तुमच्यातील बोलणं कमी का झालं असा दिपा तिला विचारते. त्यावर आयशाने मला तसं वागायला सांगितलं. हे कार्तिकी दिपाला सांगते. त्यानंतर दिपा आयशाची भेट घेऊन असं वागण्याचं कारण विचारते. आता दिपाने आयशाला मारल्यानंतर या मालिकेत पुढे काय होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.