राजा रानीची गं जोडी : कुसुमावतींनी केला अपर्णाला जीवे मारण्याचा प्रयत्न?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 14:05 IST2021-09-27T14:03:15+5:302021-09-27T14:05:07+5:30

Raja rani chi ga jodi : ढालेपाटील कुटुंबाला नष्ट करण्याचा विडा उचलणाऱ्या अपर्णाचाच मृत्यू होणार असल्याचं समोर आलं आहे.

marathi tv serial raja rani chi ga jodi kusumavati and aparna war | राजा रानीची गं जोडी : कुसुमावतींनी केला अपर्णाला जीवे मारण्याचा प्रयत्न?

राजा रानीची गं जोडी : कुसुमावतींनी केला अपर्णाला जीवे मारण्याचा प्रयत्न?

ठळक मुद्देकलर्स मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक 'राजा रानीची गं जोडी'चा एक प्रोमो शेअर केला आहे.

छोट्या पडद्यावर  तुफान गाजत असलेली मालिका म्हणजे राजा रानीची गं जोडी. अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकणारी ही मालिका सध्या रंजक वळणावर आली आहे. ढालेपाटील कुटुंबात दररोज नवनवीन घटना घडत आहेत. यात सूरजला फसवणारी अपर्णा पुन्हा एकदा त्याच्या आयुष्यात आली आहे. मात्र, यावेळी तिने संपूर्ण ढालेपाटील कुटुंबाला उद्धवस्त करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे सध्या ही मालिका चांगलीच रंगात येत आहे. मात्र, ढालेपाटील कुटुंबाला नष्ट करण्याचा विडा उचलणाऱ्या अपर्णाचाच मृत्यू होणार असल्याचं समोर आलं आहे.

कलर्स मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक 'राजा रानीची गं जोडी'चा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये कुसुमावती ढालेपाटीलच अपर्णाचा खून करणार असल्याचं दिसून येत आहे. यात त्यांनी अपर्णावर बंदूक धरल्याचं पाहायला मिळत आहे.

Taarak Mehta च्या या अभिनेत्याला ओळखलंत का? रिअल लाइफमध्ये आहे जेठालालसोबत खास कनेक्शन

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अपर्णा आणि कुसुमावती यांच्यात चर्चा सुरु असून अपर्णा ढालेपाटील कुटुंबाला कशा पद्धतीने नष्ट करणार हे सांगत आहे. तर, संपूर्ण कुटुंबासाठी मी ढाल म्हणून उभी आहे, असं म्हणत कुसुमावती अपर्णावर गोळी झाडतात. याच वेळी बंदुकीचा आवाज ऐकून रणजीत आणि संजू घरात प्रवेश करतात. परंतु, कुसुमावती यांची गोळी अपर्णाला लागते की नाही किंवा पुढे नेमकं काय होतं. हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

दरम्यान,  सध्या 'राजा रानीची गं जोडी' या मालिकेत अनेक चढउतार येत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, या सगळ्या संकटांना संजू आणि रणजीत ज्या पद्धतीने सामोरं जात आहेत. ते पाहून प्रेक्षकांकडून या मालिकेला लोकप्रियता मिळत आहे. 
 

Web Title: marathi tv serial raja rani chi ga jodi kusumavati and aparna war