Video: साळगांवकरांचा स्वॅग; इंद्राच्या लग्नात कुटुंबीयांनी केला रावडी डान्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 18:06 IST2022-07-28T18:06:14+5:302022-07-28T18:06:49+5:30
Man udu udu zhala: सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये संपूर्ण साळगावकर कुटुंबीय चला जाता हूँ या गाण्यावर बिंधास्त डान्स करताना दिसत आहेत.

Video: साळगांवकरांचा स्वॅग; इंद्राच्या लग्नात कुटुंबीयांनी केला रावडी डान्स
अल्पावधीत लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे 'मन उडू उडू झालं' (man udu udu zhala). उत्तम कथानक आणि कलाकारांचा अभिनय यामुळे ही मालिका प्रेक्षकांना विशेष भावली. अलिकडेच या मालिकेत इंद्रा आणि दिपूचा लग्नसोहळा पार पडला. त्यामुळे मालिकेत अद्यापही या लग्नाचे भाग दाखवण्यात येत आहेत. सोबतच या मालिकेतील कलाकार मंडळीदेखील लग्नाच्या निमित्ताने सेटवर कशाप्रकारे मज्जा केली याचे अपडेट चाहत्यांना देत आहेत.
या मालिकेत दिपूच्या बहिणीची म्हणजेच सानिकाची भूमिका अभिनेत्री रिना मधुकर हिने साकारली आहे. रिना सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून ती कायम चाहत्यांसोबत सेटवरील किस्से शेअर करत असते. यात अलिकडेच तिने इंद्रा-दिपूच्या लग्नाच्या सेटवरील व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये संपूर्ण साळगावकर कुटुंबीयांचा हटके स्वॅग पाहायला मिळत आहे.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये संपूर्ण साळगावकर कुटुंबीय 'चला जाता हूँ' या गाण्यावर बिंधास्त डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये इंद्रा, सानिका, मुक्ता, इंद्राची आई, सत्तू दिसून येत आहेत.
दरम्यान, मन उडू उडू झालं ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. तसंच या मालिकेतील दिपू म्हणजेच अभिनेत्री हृता दुर्गुळे आता या मालिकेनंतर 'अनन्या' आणि 'टाईमपास 2' या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.