देशपांडे सरांचा निर्णय झुगारुन दिपू देणार इंद्राची साथ; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 12:56 PM2022-06-22T12:56:27+5:302022-06-22T12:56:51+5:30

Man udu udu zal: दिपूचा विरह इंद्राला सहन न झाल्यामुळे तो एकाकी पडला आहे. इंद्राला याच अवस्थेत दिपू आणि देशपांडे सर पाहतात.

marathi tv serial man udu udu zal new twist in indra and deepu relation | देशपांडे सरांचा निर्णय झुगारुन दिपू देणार इंद्राची साथ; Video व्हायरल

देशपांडे सरांचा निर्णय झुगारुन दिपू देणार इंद्राची साथ; Video व्हायरल

googlenewsNext

'मन उडू उडू झालं' (man udu udu zal) या मालिकेत सध्या दिपू आणि इंद्रा यांच्या आयुष्यात अनेक चढउतार येत असल्याचं पाहायला मिळत आहे. सुरुवातीला इंद्रासोबत दिपूचं लग्न लावून देण्यासाठी तयार असलेल्या देशपांडे सरांनी आता या लग्नाला विरोध केला आहे. इतकंच नाही तर इंद्रासोबत असलेले सगळे संबंध तोडण्याची ताकीदही दिपूला दिली आहे. मात्र, देशपांडे सरांचा आदेश झुगारून दिपू इंद्राची साथ देणार आहे.

सानिका आणि कार्तिक यांनी रचलेल्या डावाप्रमाणे इंद्राचं सत्य देशपांडे सरांसमोर आलं. इतकंच नाही तर सानिकाने इंद्राविषयी अनेक गैरसमज देशपांडे सरांच्या मनात निर्माण केले. ज्यामुळे देशपांडे सरांनी या लग्नाचा विरोध केला. त्यामुळे आता इंद्रा आणि दिपूची ताटातूट झाली आहे. या परिस्थितीतही इंद्रा देशपांडे सरांचा मान राखून आहे.परंतु, त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.

सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये दिपूपासून दुरावलेल्या इंद्राची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. दिपूचा विरह त्याला सहन न झाल्यामुळे तो एकाकी पडला आहे. इंद्राला याच अवस्थेत दिपू आणि देशपांडे सर पाहतात. मात्र, इंद्राजवळ जाण्यासाठी देशपांडे सर तिला अडवतात. विशेष म्हणजे इंद्रावर असलेल्या प्रेमापोटी पहिल्यांदाच दिपू देशपांडे सरांना विरोध,निर्णय झुगारुन ती इंद्राकडे धाव घेते. त्यामुळे आता या मालिकेत देशपांडे सर पुढे कोणता निर्णय घेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
 

Web Title: marathi tv serial man udu udu zal new twist in indra and deepu relation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.