मुहूर्त ठरला! प्राजक्ता गायकवाड अन् शंभूराज खुटवड 'या' दिवशी अडकणार विवाहबंधनात, लग्नपत्रिका पाहिलीत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 10:52 IST2025-10-04T10:48:41+5:302025-10-04T10:52:25+5:30
आली लग्नघटिका समीप! प्राजक्ता गायकवाड अन् शंभूराज खुटवड या दिवशी अडकणार विवाहबंधनात, लग्नपत्रिका पाहिलीत?

मुहूर्त ठरला! प्राजक्ता गायकवाड अन् शंभूराज खुटवड 'या' दिवशी अडकणार विवाहबंधनात, लग्नपत्रिका पाहिलीत?
Prajakta Gaikwad: अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हे नाव मराठी मालिकारसिकांसाठी नवं नाही. 'स्वराज्यरक्षक संभाजी' या ऐतिहासिक मालिकेतून प्राजक्ता गायकवाड ही महाराष्ट्रातील घराघरात लोकप्रिय झाली. सध्या कलाविश्वात या अभिनेत्रीच्या लग्नाबद्दल चर्चा आहे. अलिकडेच प्राजक्ता गायकवाडचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला. त्यानंतर आता लवकरच प्रेक्षकांची ही लाडकी नायिका लग्नबंधनात अडकणार आहे.नुकताच अभिनेत्रीने सोशल मीडियावर लग्नपत्रिकेचा व्हिडीओ शेअर करत लग्नाची तारीखही जाहीर केली आहे.
अगदी काही महिन्यांपूर्वीच प्राजक्ताने सोशल मीडियावर 'कुंकवाचा कार्यक्रम', 'पाहुणे मंडळी', अशी पोस्ट शेअर करत चाहत्यांना लग्नाची हिंट दिली होती. त्यानंतर ७ ऑगस्टच्या दिवशी प्राजक्ताचा साखरपुडा मोठ्या थाटात पार पडला. पण, अभिनेत्रीने तिचा होणारा नवरा कोण आहे, याबद्दल कोणताही खुलासा केला नव्हता. त्यानंतर तिने साखरपुड्याचे फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. तेव्हापासून प्राजक्ता कधी लग्नबंधनात अडकणार याबद्दल जाणून घेण्यास तिच्या चाहत्यांना प्रचंड उत्सुकता होती. अखेर सोशल मीडियावर आपल्या लग्नपत्रिकेचा फोटो शेअर करत तिने वेडिंग डेट रिव्हिल केली आहे.
दरम्यान, प्राजक्ता गायकवाडने तिच्या अधिकृत सोशल मिडिया अकाउंटवर लग्नपत्रिका पूजनाचा सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय की लग्नपत्रिका आणि त्याचबरोबर अक्षता, हळद-कुंकू दिसत आहे. शिवाय मोराची पिसे, गुलाबाच्या पाकळ्यांची सजावट केलेली पाहायला मिळतेय.अत्यंत साधी पण तितकीच सुंदरित्या अभिनेत्रीची पत्रिका डिझाइन केलेली आहे.
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज खुटवड यांच्या लग्नाची पत्रिका नुकतीच समोर आली आहे. येत्या २ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२.२४ वाजता हा लग्नसोहळा संपन्न होणार आहे. अभिनेत्रीची लग्नपत्रिका पाहून कलाविश्वातील सेलिब्रिटी आणि तिच्या चाहत्यांनी लाईक्स, कमेंट्सच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.