"पूर्णा आजी गेल्या त्या दिवशी...", ज्योती चांदेकरांबद्दल बोलताना 'ठरलं तर मग' मधील अश्विन झाला भावुक, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 15:37 IST2025-12-03T15:24:21+5:302025-12-03T15:37:15+5:30
"माणूस गमावल्याचं दु:ख..." ज्योती चांदेकरांच्या आठवणीत ऑनस्क्रिन नातू झाला भावुक, म्हणाला- "खूप कठीण..."

"पूर्णा आजी गेल्या त्या दिवशी...", ज्योती चांदेकरांबद्दल बोलताना 'ठरलं तर मग' मधील अश्विन झाला भावुक, म्हणाला...
Tharala Tar Mag Actor Pratik Suresh : छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय असणारी मालिका म्हणजे ठरलं तर मग. गेली ३ वर्ष ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते आहे. दरम्यान,या मालिकेचं कथानक, सायली-अर्जुनची केमिस्ट्री या सगळ्या गोष्टींची चाहत्यांमध्ये चर्चा होत असते. त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराला आता घराघरात पोहोचला आहे. प्रेक्षकांच्या या प्रतिसादामुळेच ठरलं तर मग मालिकेने १००० भागांचा यशस्वी टप्पा गाठला.याचनिमित्ताने वाहिनीने सोशल मीडियावर मालिकेतील कलाकारांचेही काही व्हिडिओ शेअर केले आहेत. ज्यामध्ये प्रत्येकाने आपल्या भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, ठरलं तर मग मालिकेत अभिनेता प्रतीक सुरेश हा अश्विन नावाची भूमिका साकारतो आहे. मालिकेने हजार भागांचा टप्पा गाठल्यानंतर त्याचा एक भावुक करणारा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्याने पूर्णा आजींची भूमिका साकारणाऱ्या ज्योती चांदेकर यांच्याबद्दल भावुक करणारी आठवण शेअर केली आहे.
प्रतीक सुरेश काय म्हणाला?
या व्हिडीओमध्ये अश्विनला विचारण्यात आले की, '1000 एपिसोड शूटिंगदरम्यानची एक अशी आठवण कोणती, जी कधीच विसरू शकत नाही?' यावर उत्तर देत तो म्हणाला,"तीन वर्षातील माझी न विसरणारी आठवण म्हणजे पूर्णा आजी गेली तो दिवस. तो दिवस माझ्यासाठी खरंच खूप कठीण होता. पूर्णा आजी दिवशी गेली आणि आम्हाला काही कारणास्तव शूट करावं लागलं होतं, कारण एपिसोड तयार नव्हते. त्यादिवशी खरंच खूप वाईट वाटलं होतं. माणूस गमावल्याचं दु:ख तर होतंच, ती आमची आजी होती. त्यात आम्हाला जाता नाही आलं आणि शूट करावं लागलं, तो एक दिवस खरंच न विसरता येण्यासारखा आहे. असं म्हणत या व्हिडीओमध्ये अभिनेत्याने त्याच्या मनातील दु ख व्यक्त केलं आहे.
अभिनेत्री ज्योती चांदेकर या जगात नाहीत. १४ ऑगस्ट रोजी त्यांचं निधन झालं.त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसलाय.