आधी गाडी, आता नवं घर! मराठी अभिनेत्याचं स्वप्न पूर्ण; व्हिडीओ शेअर करत म्हणाले-"आजवर घेतलेले कष्ट…"
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 12:47 IST2025-12-23T12:44:31+5:302025-12-23T12:47:05+5:30
मराठी अभिनेत्याचं घरकुल साकार! साताऱ्यात घेतलं हक्काचं घर,'या' गाजलेल्या मालिकेत केलंय काम

आधी गाडी, आता नवं घर! मराठी अभिनेत्याचं स्वप्न पूर्ण; व्हिडीओ शेअर करत म्हणाले-"आजवर घेतलेले कष्ट…"
Marathi Actor Santosh Patil : मराठी कलाविश्वात असे अनेक कलाकार सापडतील ज्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर इंडस्ट्रीत हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. यापैकीच एक नाव म्हणजे अभिनेते संतोष पाटील. 'लागिरं झालं जी','अप्पी आमची कलेक्टर','साताजन्माच्या गाठी','मुलगी झाली हो' तसेच 'सहकुटंब सहपरिवार 'यांसारख्या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. उत्तम अभिनयाच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे.अलिकडेच संतोष पाटील यांच्या घरी नव्या गाडीचं आगमन झालं. त्यानंतर आता पुन्हा त्यांनी एक आनंदाची बातमी शेअर केली आहे.
‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत अप्पीच्या वडिलांची भूमिका साकारणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री मधुरा जोशीने नुकतीच नवीन घर खरेदी केलं आहे. यावर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांनी गाडी खरेदी केली होती. त्यानंतर आता संतोष पाटील यांनी हक्काच्या घरात गृहप्रवेश केला आहे. यावेळी त्यांचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं.अभिनेत्याने स्वकष्टाने घेतलेल्या घरात कुटुंबीयांसह गृहप्रवेश केला आहे.
आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर अभिनेत्याने खास व्हिडीओ शेअर करत नव्या घराची झलक दाखवली आहे. "२ नोव्हेंबर रोजी गणेशपूजन आणि गृहप्रवेश केला आम्हाला आमच्या मेहनतीने सावली करायची होती…आणखी एक इच्छा पूर्ती,,,,हर्षदाने आजवर घेतलेले कष्ट आणि माझ्या स्वप्नांना स्वतःची साथ देत सावली मिळवली,अनेक वर्षे सातत्याने प्रयत्न केले .ध्रुवी,हर्षदा आणि आई तुम्ही खूप खूप कष्टात दिवस काढले,,,कदाचित त्यामुळेच शक्य झालं…", अशा भावना संतोष पाटील यांनी या पोस्टद्वारे व्यक्त केल्या आहेत. अभिनेते संतोष पाटील हे मूळचे साताऱ्याचे. कर्दत हाईट्स, दौलतनगर, सातारा येथे त्यांनी हा फ्लॅट खरेदी केला आहे. संतोष पाटील यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांसह मराठी कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
वर्कफ्रंट
'लागिरं झालं जी' मालिकेमुळे संतोष पाटील यांना चांगली लोकप्रियता मिळाली. मूळचे साताऱ्याचे असलेले संतोष पाटील स्थानिक नाटकातून अभिनयाची आवड जोपासत होते. 'लागिर झालं जी' मालिकेसह त्यांनी 'अप्पी आमची कलेक्टर', 'साताजन्माच्या गाठी','मुलगी झाली हो' तसेच 'सहकुटंब सहपरिवार 'यांसारख्या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. आजवर ते वेगवेगळ्या मालिकांमध्ये नायिकेच्या वडिलांच्या भूमिकेत दिसले.