"भारतीय सैन्याचं शौर्य हे हिमालयाएवढं...", लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं लष्कराचं कौतुक, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 16:52 IST2025-05-09T16:49:46+5:302025-05-09T16:52:45+5:30
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर' राबवले.

"भारतीय सैन्याचं शौर्य हे हिमालयाएवढं...", लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं लष्कराचं कौतुक, म्हणाली...
Madhuri Pawar: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर' राबवले. यामध्ये पाकिस्तानमधील ( Pakistan ) ९ दहशतवादी तळांवर हल्ले केले. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. भारताच्या कारवाईने बिथरलेल्या पाकिस्तानने काल रात्री 9-10 च्या सुमारास अचानक भारतावर ड्रोन हल्ले सुरू केले. याला भारतीस सैन्याने जोरदार प्रत्युत्तर दिले असून, पाकिस्तानचे सर्व हल्ले हाणून पाडले आहेत. दरम्यान, ऑपरेशन सिंदूरचे आणि सैन्याचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. कलाकार मंडळीदेखील यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहे. यावर मराठी कलाविश्वातील अभिनेत्री माधुरी पवारने सोशल मीडियावर खास व्हिडीओ पोस्ट केला आहे.
माधुरी पवारने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडीओ पोस्ट करत त्याला कॅप्शन देत लिहिलंय की, "भारतीय सैन्याचं शौर्य हे हिमालयाएवढं अढळ आणि वाऱ्यासारखं गतिमान आहे. शत्रू काहीही करोत, आपल्या वीरांनी नेहमीच मात दिली आहे. भारतमातेला सलाम, भारतीय सैनिकांना मानाचा मुजरा!"
त्याचबरोबर या व्हिडीओमध्ये अभिनेत्री म्हणते की, नमस्कार, मी माधुरी पवार. आता तुम्हाला सगळ्यांना सांगायची काही गरज नाही. सध्या जी काही परिस्थिती आपल्या देशात सुरु आहे, भारत आणि पाकिस्तानमध्ये चकमकी सुरु झाल्या आहेत. आणि हल्ले सुरु झालेत. या सगळ्यामध्ये आपण आपल्या भारतीय सैन्याचं मनोबळ वाढवलं पाहिजे. आपण याआधी सुद्धा या गोष्टी चांगल्या पद्धतीने केल्या आहेत आता सुद्धा करायच्या आहेत. त्यामुळे आता बऱ्याच गोष्टी बदलणार आहेत. तेव्हा आपल्याला सगळ्यात जास्त सपोर्ट हा आपल्या भारतीय सेनेला करायचा आहे. त्याच्यासाठी प्रत्येकाने सज्ज व्हा, हिंमत ठेवा. अशा भावना अभिनेत्रीने व्हिडीओतून व्यक्त केल्या आहेत.
वर्कफ्रंट
माधुरी पवार ही 'देवमाणूस','रानबाजार' या कलाकृतींमुळे ती घराघरांत पोहोचली. याशिवाय माधुरी एक उत्तम नृत्यांगणा देखील आहे. सध्या अभिनेत्रीने स्टार प्रवाह वाहिनीवरील 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत काम करताना दिसत आहे. या मालिकेत माधुरी निकी नावाच्या महत्वाच्या भूमिकेत पाहायला मिळते आहे.