"माझा पाय तुटून बाजूला पडलेला...", मृत्यूच्या दाढेतून परतली अभिनेत्री, सांगितला अपघाताचा भयानक प्रसंग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 15:37 IST2026-02-01T15:27:19+5:302026-02-01T15:37:54+5:30

'येड लागलं प्रेमाचं' मधील अभिनेत्रीने सांगितला अपघाताचा प्रसंग, काय घडलेलं?

marathi television actress yed lagla premacha fame varsha dandale recalls about her horible accident  | "माझा पाय तुटून बाजूला पडलेला...", मृत्यूच्या दाढेतून परतली अभिनेत्री, सांगितला अपघाताचा भयानक प्रसंग 

"माझा पाय तुटून बाजूला पडलेला...", मृत्यूच्या दाढेतून परतली अभिनेत्री, सांगितला अपघाताचा भयानक प्रसंग 

Varsha Dandale Actress: अभिनेत्री वर्षा दांदळे हे मराठी मनोरंजनविश्वातील नावाजलेलं नाव आहे. आपल्या सहज सुंदर अभिनयाच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. 'नांदा सौख्य भरे' या मालिकेत त्यांनी साकारलेली वच्छी आत्याची भूमिका कायम प्रेक्षकांच्या आठवणीत राहणारी आहे. दरम्यान, काही वर्षांपूर्वी अभिनेत्री वर्षा दांदळे यांचा भीषण अपघात झाला होता. मात्र, प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी इंडस्ट्रीत कमबॅक केलं. सध्या वर्षा या येड लागलं प्रेमाचं मालिकेत काम करताना दिसत आहे. अशातच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी त्या भीषण अपघाताच्या प्रसंगाविषयी सांगितलं आहे.

F

'लोकमत सखी'ला दिलेल्या मुलाखतीत वर्षा दांदळे यांनी त्यांच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासावर भाष्य केलं. या मुलाखतीत त्यांना त्या भीषण अपघाताबद्दल विचारण्यात आलं. त्याबद्दल सांगताना त्या म्हणाल्या, "कार अपघात होता तो. आमची मित्रमंडळी अशी आम्ही चार जणं, एका कार्यक्रमाला नाशिकला गेलेलो. त्यावेळी करोना काळ होता. भंडारधरावरून येताना तिथे रेती टाकली होती वळणावर. असा सेम अपघात त्याच ठिकाणी झाला होता. अपघात झाल्याच्या एक महिना आम्हाला काहीच नाही कळलं. तेव्हा आमच्यापैकी एक मित्र सुदैवाने बेशुद्ध पडला नव्हता. तो शुद्धीवर होता. त्याच्यामुळे आम्ही वाचलो.  मी एकाच जागेवर होते. मी आणि माझे इतर मित्र आम्ही बेशुद्ध होतो.  कुणीच रस्त्यावर थांबायला तयार नाही, तिथे नेटवर्क नाही. मग एक माणूस भेटला, नंतर रुग्णवाहिका आली. अपघाताच्या दोन तासानंतर हे सगळं घडलं. त्यादिवशी मरण होतं. त्याच्यामुळे आम्ही वाचलो."

मग पुढे त्या म्हणाल्या, "माझी मुलगी नाशिकलाच राहते. ती फिजिओथेरपिस्ट आहे. तिने हॉस्पिटलमध्ये सगळा सेटअप तयार केला. पुढच्या दीड तासात आमचं स्कॅनिंग झालं. माझा पाय तुटून पडलेला. आता पूर्ण प्लेट आहे. माझा स्पायनल कॉर्ड तुटून बाहेर पडलेला. माझे दोन ऑपरेशन झाले. मित्राचेही दोन आणि मैत्रिणीचे दोन ऑपरेशन झाले. माझ्या मुलीने पटकन निर्णय घेतले त्यामुळे सगळं शक्य झालं. एकाच वेळी माझे दोन ऑपरेशन करायचे होते. त्यानंतर मी तीन महिने एकाच जागेवर होते. त्याच्यानंतर माझी फिजिओथेरिपी केली आणि मी सहा महिन्यात उभी राहिले." असा प्रसंग अभिनेत्रीने शेअर केला.

Web Title : अभिनेत्री वर्षा दांदले ने सुनाई जानलेवा दुर्घटना, चमत्कारी रिकवरी की कहानी।

Web Summary : 'नंदा सौख्य भरे' के लिए मशहूर वर्षा दांदले एक भयानक कार दुर्घटना में बाल-बाल बचीं। एक दोस्त की सतर्कता ने उन्हें बचाया। पैर में फ्रैक्चर और रीढ़ की हड्डी में चोट के साथ, उन्होंने कई सर्जरी और व्यापक फिजियोथेरेपी करवाई, जिससे छह महीने में अभिनय में उल्लेखनीय वापसी हुई।

Web Title : Actress Varsha Dandale recounts near-fatal accident, miraculous recovery and comeback.

Web Summary : Varsha Dandale, known for 'Nanda Saukhya Bhare,' survived a terrible car accident. A friend's awareness saved them. With a fractured leg and spinal injury, she underwent multiple surgeries and extensive physiotherapy, making a remarkable comeback to acting in six months.