VIDEO: शिवाची जबरा फॅन! अभिनेत्रीला भेटण्यासाठी चाहती थेट मालिकेच्या सेटवर पोहोचली, म्हणते...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 12:41 IST2025-01-06T12:35:37+5:302025-01-06T12:41:59+5:30
अभिनेत्री पूर्वा कौशिकने सोशल मीडियावर तिच्या एका चाहतीसोबतचा सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे.

VIDEO: शिवाची जबरा फॅन! अभिनेत्रीला भेटण्यासाठी चाहती थेट मालिकेच्या सेटवर पोहोचली, म्हणते...
Purva Kaushik Video: आपल्या आवडत्या कलाकारांना भेटण्याची चाहते कोणतीही संधी सोडत नाही. कलाकरांची फक्त एक झलक पाहण्यासाठी त्यांचे फॅन्स वाट्टेल ते करायला तयार असतात. खरंतर चाहत्यांकडून मिळणारं प्रेम, आपलेपण ही कोणत्याही कलाकारासाठी त्याच्या कामाची पोहोचपावती असते. दरम्यान, असाच एक सुखद अनुभव अभिनेत्री पूर्वा कौशिकला (Purva Kaushik) आला आहे. 'शिवा' फेम पुर्वा कौशिकने सोशल मीडियावर याचा एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे.
झी मराठीवरील 'शिवा' या मालिकेतून अभिनेत्री पूर्वा कौशिक महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली. या मालिकेच्या माध्यमातून पूर्वा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते आहे. तिचा चाहतावर्गही फार मोठा आहे. अशातच नुकताच अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिच्या एका गोड चाहतीचा व्हिडीओ शेअर केलाय. या चाहतीचं आपल्याप्रती प्रेम पाहून पूर्वा भारावून गेली आहे. दरम्यान, पूर्वा कौशिकने तिच्या इन्स्टग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सुरुवातीला ती म्हणते," आज शिवाच्या सेटवर एक गोड व्यक्ती आली आहे. ती शिवाची फॅन आहे. तिचं नाव वृषाली आहे. तिला शिवा खूप आवडते असं तिचं म्हणणं आहे आणि उत्तम गाते."
पुढे अभिनेत्री या चाहतीला तू कोणतं गाणं गाणार? असं विचारते. तेव्हा उत्तर देताना ही चाहती मी 'आपकी नजरों नें समझा' हे गाणं गाणार असल्याचं सांगते. त्यानंतर शिवाची ही चाहती आपल्या सुरेल आवाजात गाणं गायला सुरुवात करते. पूर्वा कौशिकने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "शिवा मालिकेच्या सेटवर आज गोड चाहतीची भेट झाली. तिच्या भेटीमुळे मी खूप भारावून गेले. शिवा आज खऱ्या अर्थाने जिंकली."