पुत्र जन्मला! लोकप्रिय मराठी अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन, आनंद व्यक्त करत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 08:52 IST2025-05-14T08:48:24+5:302025-05-14T08:52:08+5:30
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन, पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज

पुत्र जन्मला! लोकप्रिय मराठी अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन, आनंद व्यक्त करत म्हणाली...
Shruti Atre: छोट्या पडद्यावरील 'राजा राणीची गं जोडी' ही मालिका प्रचंड लोकप्रिय होती. अभिनेत्री शिवानी सोनार आणि मणिराज पवार यांची प्रमुख भूमिका असलेली ही मालिका चांगलीच गाजली. याच मालिकेत राजश्री ढाले हे खलनायिकेचं पात्र साकारुन अभिनेत्री श्रुती अत्रे घराघरात पोहोचली. तिच्या कामाचं सगळीकडे कौतुक झालं. दरम्यान, अलिकडेच ही अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अगदी काही दिवसांपूर्वीच श्रुतीने मदर्स डे या दिवसाचं औचित्य साधून ती आई होणार असल्याचं जाहिर केलं होतं. आता अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे.
श्रुती अत्रेने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत तिला पुत्ररत्न प्राप्ती झाल्याची माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये तिने गुडन्यूज शेअर करत लिहिलंय की, "१२/५/२०२५ ,आमचं कुटुंब आता पूर्वीपेक्षा अधिक आणि मोठं झालं आहे... बेबी बॉय... ", अशा आशयाची पोस्ट तिने लिहिली आहे. श्रुतीने शेअर केलेल्या या पोस्टवर मराठी सेलिब्रिटींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.अनेकांनी श्रुती आणि तिचा पती अश्विनला भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत.
मातृदिनानिमित्त शेअर केली पोस्ट-
श्रुती अत्रेने मातृदिनानिमित्त शेअर केलेल्या पोस्टमध्ये ती गरोगर असल्याचं सांगितलं आहे. त्यामध्ये तिने लिहिलं होतं की, "यंदाचा मातृदिन माझ्यासाठी वेगळा आहे. आमचं कुटुंब आता मोठं होणार आहे आणि ही गोड बातमी तुम्हा सर्वांसोबत शेअर करताना आम्हाला प्रचंड आनंद होत आहे. हा प्रवास माझ्यासाठी सोपा नव्हता… या प्रवासात असंख्य अडचणी आल्या, त्यामध्ये काही भीतीचे क्षण होते. पण, या सगळ्या प्रवासात आमच्यासोबत तुम्हा सर्वांचं प्रेम कायम होतं. प्रत्येक आईला आणि लवकरच आई होणाऱ्या प्रत्येक महिलेला मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा! एक नवीन सुरुवात…मातृत्व, मदर्स डे स्पेशल…” अशा भावना श्रुतीने पोस्ट शेअर करत व्यक्त केल्या.
वर्कफ्रंट
श्रुती अत्रेला 'राजा राणीची गं जोडी' 'बन मस्का' आणि 'बापमाणूस' या मालिकांमधून खूप लोकप्रियता मिळाली. त्याचबरोबर अलिकडेच ती 'कॉन्स्टेबल मंजू' मालिकेत पाहायला मिळाली. श्रुतीने काही वर्षांपूर्वी अश्विन दिवेकर यांच्यासोबत २०१९ मध्ये लग्न केलं आहे. त्याच्या सुखी संसाराला ६ वर्ष झाली असून आता हे जोडप्याच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे.