"माझे सुद्धा पैसे अडकलेत...", कलाकारांच्या थकीत मानधनावर मराठी अभिनेत्रीचं परखड मत, म्हणाली-"खूप वाईट…"
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 12:23 IST2026-02-24T12:20:48+5:302026-02-24T12:23:18+5:30
"हे खूप वाईट…", कलाकारांच्या थकीत मानधनाच्या मुद्यावर मराठी अभिनेत्रीची प्रतिक्रिया, म्हणाली....

"माझे सुद्धा पैसे अडकलेत...", कलाकारांच्या थकीत मानधनावर मराठी अभिनेत्रीचं परखड मत, म्हणाली-"खूप वाईट…"
Vidisha Mhaskar: मनोरंजनाच्या झगमगत्या विश्वाचं आकर्षण अनेकांना असतं. या ग्लॅमरच्या जगात काम करताना मिळणारी प्रसिद्धी, लोकप्रियता आणि मानधन यामुळे सेलिब्रिटी अनेकदा चर्चेत येतात. पण अनेकदा सेलिब्रिटींना त्यांच्या काम करूनही त्याचा मोबदला वेळेत मिळत नाही. असं अनेकजण याबद्दल बोलताना दिसतात. बऱ्याचदा प्रोडक्शन हाऊसेसने कलाकारांचे पैसे बुडवणं किंवा ठरलेल्या वेळेत मानधन नं देणं असे प्रकार सर्सास घडताना दिसत आहेत. याच मुद्द्यावर मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री विदिशा म्हसकरने तिची प्रतिक्रिया दिली आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
नुकतीच विदिशा म्हसकरने राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने आपला इंडस्ट्रीतील संपूर्ण प्रवास उलगडला आहे. याच दरम्यान, आपण जीव तोडून काम करूनही पैसे अडकतात. तुझ्याबाबतीत काय घडलेलं का? असा प्रश्न विचारले गेला. त्याबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली," हो, माझे सुद्धा पैसे अडकलेत. तेव्हा खूप जास्त वाईट वाटलं होतं. कारण, आता मी कमावते आहे.पण, तेव्हा माझ्याकडे खरंच पैसे नसायचे. मला जे काही पैसे मिळायचे त्यामध्ये घरभाडे, खाणं-पिणं तसेच प्रवासासाठी पैसे लागायचे. अशा वेळी जेव्हा तुम्ही प्रायमरी स्टेजला आहात... तुमचं काम लोकांना आवडतंय... प्रशंसा होतेय... तरीही तुम्हाला तुमच्या ४-५ महिन्यांच्या कामाचे पैसे मिळत नाहीत. तेव्हा आपण हक्काचे पैसे मिळवण्यासाठी झगडावं लागतं. हे खूप वाईट आहे."
यापुढे विदिशा म्हणाली, "पण, देवाच्या कृपेने मला पटापट कामं मिळत गेली. मग मी त्या गोष्टीचा विचार करणं सोडून दिलं. त्यानंतर मी त्या पैशांवर पाणी सोडलं. याच्या डबल आपल्याला मिळणार आहे... असं मला वाटत होतं. शेवटी तसंच झालं. मला छान कामे मिळत गेली. मी इव्हेंट्स करू लागले. त्याच्यामधून मला उत्पन्नाचं साधन निर्माण झालं. पण, इंडस्ट्रीत असं होत राहतं. यावर काहीतरी नियम असायला पाहिजेत. ज्यामुळे आम्हा कलाकारांचे निदान काम केलेले हक्काचे पैसे मिळाले पाहिजेत." अशी स्पष्ट भूमिका अभिनेत्रीने मांडली.
वर्कफ्रंट
विदिशा म्हसकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर बन मस्का मालिकेतून तिने इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. त्यानंतर 'हे मन बावरे', 'ती फुलराणी', 'चांदणे शिंपित जाशी', 'रंग माझा वेगळा',' ३६ गुणी जोडी',' पिंगा गं पोरी पिंगा' यांसारख्या मालिकांमध्ये काम करत तिने प्रेक्षकांच्या मनावर अभिनयाची छाप उमटवली आहे.