"शूटिंगचे शेवटचे काही दिवस...", 'नवरी मिळे हिटलरला' मधील अभिनेत्रीने शेअर केला 'तो' फोटो; प्रेक्षक भावुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 18:12 IST2025-05-06T18:08:16+5:302025-05-06T18:12:23+5:30
सध्या मराठी मालिकाविश्वात बऱ्याच नवनवीन मालिका दाखल होत आहेत.

"शूटिंगचे शेवटचे काही दिवस...", 'नवरी मिळे हिटलरला' मधील अभिनेत्रीने शेअर केला 'तो' फोटो; प्रेक्षक भावुक
Vallari Viraj: सध्या मराठी मालिकाविश्वात बऱ्याच नवनवीन मालिका दाखल होत आहेत. त्यामुळे जुन्या मालिका बंद होऊन त्याच्या जागी नव्या मालिकांची घोषणा करण्यात येत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. टीआरपीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी वाहिन्यांकडूनर प्रयोग करण्यात येत आहेत. त्यात आता आणखी एक लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. ही मालिका म्हणजे 'नवरी मिळे हिटलरला' (Navri Mile Hitlarla) आहे. दरम्यान, या मालिकेतील मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री वल्लरी विराजने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.
गेल्यावर्षी १८ मार्चपासून 'नवरी मिळे हिटलरला' मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. परंतु मागील काही दिवसांपासून ही लोकप्रिय मालिका बंद होणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. याबाबत आता मालिकेत लीलाची भूमिका साकारणाऱ्या वल्लरी विराजने इन्स्टाग्राम स्टोरीवर लक्षवेधी पोस्ट शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये वल्लरीने अभिनेता राकेश बापटबरोबरचा फोटो शेअर करन त्याला भावुक असं कॅप्शन दिलं आहे. "शूटिंगचे शेवटचे काही दिवस...", असं कॅप्शन अभिनेत्रीने या स्टोरीला दिलं आहे. त्यामुळे चाहते देखील भावुक झाले आहेत. जवळपास वर्षभरापूर्वी सुरु झालेली ही मालिका बंद होणार असल्याचं कळताच, मालिका रसिक नाराज झाले आहेत.
दरम्यान, 'नवरी मिळे हिटलरला' ही मालिका प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली होती. अगदी अल्पावधीतच या मालिकेने लोकप्रियतेच शिखर गाठलं होतं. सगळीकडे घराघराच या मालिकेबद्दल चर्चा सुरु असायची. परंतु ही मालिका आता बंद होणार असल्याचं कळतंय.